नवी दिल्ली : केंद्र सरकारने तामिळनाडू औद्योगिक विकास महामंडळ व ट्र्यू डेव्हलपर्ससह २२ विशेष आर्थिक क्षेत्रांची (सेझ) मंजुरी रद्द केली आहे. हे सगळे प्रकल्प सुरू होण्यात समाधानकारक प्रगती न दिसल्यामुळे त्यांची मंजुरी रद्द करण्यात आली आहे.
वाणिज्य सचिव राजीव खेर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंजुरी मंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला. वाणिज्य मंत्रालयाने म्हटले आहे की, ‘विचारविनिमयानंतर मंडळाने या प्रकल्पांची मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेतला. डेव्हलपरला एक प्रमाणपत्र सादर करावे लागेल. या प्रमाणपत्रात त्यांनी सेझ कायदा किंवा नियमांतर्गत सेवाकर सूटसह कोणताही कर, शुल्क लाभ घेतलेला नाही व घेतला असल्यास तो लाभ सरकारला परत करावा लागेल, असे म्हटलेले असेल.’ ज्या २२ प्रकल्पांची मंजुरी रद्द झाली त्यात १९ प्रकल्प हे माहिती व तंत्रज्ञान क्षेत्राशी संबंधित होते व उर्वरित बहुउत्पादने, अभियांत्रिकी, हार्डवेअर क्षेत्रातील होते.
सेझचे २२ प्रकल्प रद्द; २७ प्रकल्पांना मुदतवाढ
केंद्र सरकारने तामिळनाडू औद्योगिक विकास महामंडळ व ट्र्यू डेव्हलपर्ससह २२ विशेष आर्थिक क्षेत्रांची (सेझ) मंजुरी रद्द केली आहे. हे सगळे प्रकल्प सुरू होण्यात समाधानकारक प्रगती
By admin | Updated: June 18, 2015 02:09 IST2015-06-18T02:09:33+5:302015-06-18T02:09:33+5:30
केंद्र सरकारने तामिळनाडू औद्योगिक विकास महामंडळ व ट्र्यू डेव्हलपर्ससह २२ विशेष आर्थिक क्षेत्रांची (सेझ) मंजुरी रद्द केली आहे. हे सगळे प्रकल्प सुरू होण्यात समाधानकारक प्रगती
