Lokmat Money > बिझनेस न्यूज > सातवा वेतन आयोग याच वर्षात देणार

सातवा वेतन आयोग याच वर्षात देणार

सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी २०१६-२०१७ या आर्थिक वर्षातच होणार असून केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना सध्या ज्या सवलती व भत्ते मिळताहेत त्यात काहीही बदल होणार नाही.

By admin | Updated: March 5, 2016 03:14 IST2016-03-05T03:14:59+5:302016-03-05T03:14:59+5:30

सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी २०१६-२०१७ या आर्थिक वर्षातच होणार असून केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना सध्या ज्या सवलती व भत्ते मिळताहेत त्यात काहीही बदल होणार नाही.

The seventh pay commission will give this year | सातवा वेतन आयोग याच वर्षात देणार

सातवा वेतन आयोग याच वर्षात देणार

नवी दिल्ली : सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी २०१६-२०१७ या आर्थिक वर्षातच होणार असून केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना सध्या ज्या सवलती व भत्ते मिळताहेत त्यात काहीही बदल होणार नाही. विशेष म्हणजे सातव्या वेतन आयोगाने जोखीम भत्ता, छोटे कुटुंब भत्ता, सणानिमित्त दिली जाणारी व मोटारसायकल उचल आदी रद्द कराव्यात अशी शिफारस केलेली आहे.
अर्थसंकल्पाच्या दस्तावेजाने सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी चालू आर्थिक वर्षात एक जानेवारी २०१६ पासून होईल, असे स्पष्ट केले. सरकारने या अंमलबजावणीमुळे पडणाऱ्या अतिरिक्त खर्चाची तरतूदही केल्याचे त्यात म्हटले आहे. मात्र किती रकमेची तरतूद करण्यात आली याचा त्यात उल्लेख नाही. २०१६-२०१७ वर्षात यासाठी किती रक्कम लागेल हे नेमके सांगता येणार नाही, कारण सचिवांच्या समितीला आधी तिच्या शिफारशी आम्हाला द्यायच्या आहेत व त्यानंतरच आम्ही निर्णय घेऊ शकू की किती पैसे लागतील, असे आर्थिक व्यवहारांचे सचिव शक्तिकांत दास म्हणाले. आयोगाच्या अंमलबजावणीसाठी सरकारला १.०२ लाख कोटी रुपये लागणार आहेत. आमच्याकडे आयोगाच्या शिफारशी आहेत व त्यासाठी किती रक्कम लागणे शक्य आहे याचे विश्लेषणही आम्ही केले आहे.

Web Title: The seventh pay commission will give this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.