Lokmat Money > बिझनेस न्यूज > वाटमारी करणार्‍या दोघांना अटक सातजण पळाले : नरंदे खिंड परिसरात पोलिसांचीच गाडी अडवली

वाटमारी करणार्‍या दोघांना अटक सातजण पळाले : नरंदे खिंड परिसरात पोलिसांचीच गाडी अडवली

हातकणंगले : हातकणंगले-पेठवडगाव मार्गावर नरंदे खिंड येथे रस्त्यावर दगड टाकून तलवार, चाकूचा धाक दाखवून वाहनधारकांना लुटण्याच्या हेतूने दरोड्याच्या तयारीत असलेल्या दोघांना हातकणंगले पोलिसांनी शुक्रवारी पहाटे रंगेहाथ पकडले. धनाजी शामराव गोसावी (वय २६) व सागर संभाजी गोसावी (वय २६, दोघे रा. बागणी, ता. वाळवा) अशी त्यांची नावे आहेत. त्यांना आज वडगाव न्यायालयात हजर केले असता १६ सप्टेंबरपर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.

By admin | Updated: September 12, 2014 22:38 IST2014-09-12T22:38:29+5:302014-09-12T22:38:29+5:30

हातकणंगले : हातकणंगले-पेठवडगाव मार्गावर नरंदे खिंड येथे रस्त्यावर दगड टाकून तलवार, चाकूचा धाक दाखवून वाहनधारकांना लुटण्याच्या हेतूने दरोड्याच्या तयारीत असलेल्या दोघांना हातकणंगले पोलिसांनी शुक्रवारी पहाटे रंगेहाथ पकडले. धनाजी शामराव गोसावी (वय २६) व सागर संभाजी गोसावी (वय २६, दोघे रा. बागणी, ता. वाळवा) अशी त्यांची नावे आहेत. त्यांना आज वडगाव न्यायालयात हजर केले असता १६ सप्टेंबरपर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.

Seven people were arrested for sharing the dispute: Police stopped the vehicle in the Nanded Khind area | वाटमारी करणार्‍या दोघांना अटक सातजण पळाले : नरंदे खिंड परिसरात पोलिसांचीच गाडी अडवली

वाटमारी करणार्‍या दोघांना अटक सातजण पळाले : नरंदे खिंड परिसरात पोलिसांचीच गाडी अडवली

तकणंगले : हातकणंगले-पेठवडगाव मार्गावर नरंदे खिंड येथे रस्त्यावर दगड टाकून तलवार, चाकूचा धाक दाखवून वाहनधारकांना लुटण्याच्या हेतूने दरोड्याच्या तयारीत असलेल्या दोघांना हातकणंगले पोलिसांनी शुक्रवारी पहाटे रंगेहाथ पकडले. धनाजी शामराव गोसावी (वय २६) व सागर संभाजी गोसावी (वय २६, दोघे रा. बागणी, ता. वाळवा) अशी त्यांची नावे आहेत. त्यांना आज वडगाव न्यायालयात हजर केले असता १६ सप्टेंबरपर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.
हातकणंगले पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी, शुक्रवारी पहाटे ४च्या सुमारास नरंदे खिंड परिसरात रस्त्यावर दगड आडवे टाकून आठ-दहा तरुण दबा धरून बसले होते. येणार्‍या वाहनधारकांना लुटून पळून जाण्याचा त्यांचा प्रयत्न होता. हातकणंगले पोलिसांची गस्त पथकाची गाडी या लुटारूंनी अडविली आणि ते पोलिसांच्या जाळ्यात अडकले. पोलीस गाडी पाहताच त्यांनी स्वत:च्या मोटारसायकलवरून पळ काढला. मात्र, पोलिसांनी पाठलाग करून यातील धनाजी गोसावी आणि सागर गोसावी यांना ताब्यात घेतले. इतर सहा सातजण पसार झाले. त्यांचा शोध पोलीस घेत आहेत.
या लुटारू टोळीक डून या मार्गावरील वाहनधारक लूट प्रकरणाचा व चेन स्नॅचिंग प्रकरणाचा छडा लागण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. या संशयित आरोपींना आज वडगाव न्यायालयात हजर केले असता त्यांना १६ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी करीत आहेत.

Web Title: Seven people were arrested for sharing the dispute: Police stopped the vehicle in the Nanded Khind area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.