नवी दिल्ली : सेन्सेक्सवरील सात कंपन्यांच्या बाजार भांडवलात गेल्या आठवड्यात मोठी घसरण नोंदली गेली. या कंपन्यांचे भांडवल ९०,४५२.१८ कोटी रुपयांनी घटले. ओएनजीसी आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांना सर्वाधिक तोटा झाला. भांडवल घटलेल्या कंपन्यांत रिलायन्स इंडस्ट्रीज, ओएनजीसी, आयटीसी, कोल इंडिया, एसबीआय, इन्फोसिस आणि आयसीआयसीआय बँक यांचा समावेश आहे. दुसरीकडे टीसीएस, एचडीएफसी बँक आणि शीर्ष १० कंपन्यांच्या यादीत नुकतेच समाविष्ट झालेल्या लार्सन अॅण्ड टुब्रो यांचा समावेश आहे. ओएनजीसीचे बाजार भांडवल गेल्या आठवड्यात २५,०२४.८१ कोटी रुपयांनी कमी होऊन ३,२३,६११.४१ कोटी रुपये राहिले. रिलायन्स इंडस्ट्रीजचे भांडवल २०,२६६.२८ कोटींनी घटून ३,४४,२८४.४१ कोटी रुपये झाले. कोल इंडियाचे बाजार भांडवलही कमी होऊन २,३४,४३१.८६ कोटी रुपयांवर आले. एसबीआयचे भांडवल १५,९२८.१४ कोटी रुपयांनी घटून १,८९,७७१.४१ कोटी रुपये झाले. इन्फोसिसचे बाजार भांडवलही कमी होऊन १,६८,९११.५७ कोटींवर आले. याच आठवड्यात टीसीएस या माहिती तंत्रज्ञान कंपनीचे बाजार भांडवल ३,२९०.६६ कोटी रुपयांनी वाढून ४,१९,९९०.४५ कोटी रुपये झाले. याचप्रमाणे एलअॅण्डटीची बाजारक्षमता वाढून १,४३,६४६.३८ कोटी रुपयांवर पोहोचली. दहा सर्वोच्च कंपन्यांत टीसीएस प्रथम क्रमांकावर राहिली. त्यानंतर रिलायन्स, ओएनजीसी, आयटीसी, कोल इंडिया, एचडीएफसी बँक, एसबीआय, इन्फोसिस, आयसीआयसीआय बँक आणि एलअॅण्डटी यांचे स्थान राहिले. गेल्या आठ मुंबई शेअर बाजारचा सेन्सेक्स ४७६ अंकांनी कमी होऊन २४,२१७.३४ अंकांवर बंद झाला. (लोकमत न्यूज नेटवर्क)
सात कंपन्यांच्या बाजार भांडवलात घट
सेन्सेक्सवरील सात कंपन्यांच्या बाजार भांडवलात गेल्या आठवड्यात मोठी घसरण नोंदली गेली. या कंपन्यांचे भांडवल ९०,४५२.१८ कोटी रुपयांनी घटले
By admin | Updated: June 2, 2014 06:26 IST2014-06-02T06:26:57+5:302014-06-02T06:26:57+5:30
सेन्सेक्सवरील सात कंपन्यांच्या बाजार भांडवलात गेल्या आठवड्यात मोठी घसरण नोंदली गेली. या कंपन्यांचे भांडवल ९०,४५२.१८ कोटी रुपयांनी घटले
