Lokmat Money > बिझनेस न्यूज > आजपासून सेवाकर होणार १४ टक्के

आजपासून सेवाकर होणार १४ टक्के

शिक्षण उपकरासह १२.३६ टक्के असलेला सेवाकर १ जूनपासून १४ टक्के होत आहे. त्यामुळे मोबाईलवरील बोलणे, हॉटेलमध्ये जेवण करणे

By admin | Updated: May 31, 2015 23:41 IST2015-05-31T23:41:30+5:302015-05-31T23:41:30+5:30

शिक्षण उपकरासह १२.३६ टक्के असलेला सेवाकर १ जूनपासून १४ टक्के होत आहे. त्यामुळे मोबाईलवरील बोलणे, हॉटेलमध्ये जेवण करणे

Service tax will be 14 percent today | आजपासून सेवाकर होणार १४ टक्के

आजपासून सेवाकर होणार १४ टक्के

नवी दिल्ली : शिक्षण उपकरासह १२.३६ टक्के असलेला सेवाकर १ जूनपासून १४ टक्के होत आहे. त्यामुळे मोबाईलवरील बोलणे, हॉटेलमध्ये जेवण करणे, प्रवास करणे यासह सर्व सेवा महागणार आहेत.
केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात सेवाकर वाढविण्याची घोषणा केली होती. काही मोजक्या विशिष्ट सेवा वगळता सर्व प्रकारच्या सेवांवर सेवाकर लागतो. रेल्वे, विमान, बँकिंग, विमा, जाहिरात, आर्किटेक्चर, बांधकाम, के्रडिट कार्ड, कार्यक्रम व्यवस्थापन आणि टूर आॅपरेटिंग आदी सेवांना वाढीव सेवाकर लागू होणार आहे.
मोबाईल आॅपरेटर आणि क्रेडिट कार्ड कंपन्यांनी आपल्या ग्राहकांना आधीच वाढीव सेवाकराचे संदेश पाठविणे सुरू केले आहे.
अरुण जेटली यांनी वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) व्यवस्थेत सुगमता आणण्यासाठी सेवाकर १४ टक्के केला आहे. जीएसटी एप्रिल २0१६ पासून लागू होणार आहे. जीएसटी लागू झाल्यानंतर सेवाकर, उत्पादन शुल्क आणि अन्य स्थानिक शुल्क त्यात समाविष्ट होऊन जातील.

Web Title: Service tax will be 14 percent today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.