मुंबई : सलग तिसऱ्या दिवशी तेजी दर्शविणारा सेन्सेक्स ११.४४ अंकांनी वर चढून २५,५६१.१६ अंकावर बंद झाला. सेन्सेक्सचा हा एक आठवड्याचा उच्चांक ठरला आहे. धातू आणि ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी आल्यामुळे सेन्सेक्सला लाभ मिळाला.
खरे म्हणजे सत्रादरम्यान सेन्सेक्स ६४ अंकांनी वर चढला होता. मात्र, नंतर रिअल्टी, आॅईल-गॅस आणि आॅटो या क्षेत्रातील कंपन्यांत मोठ्या प्रमाणात नफा वसुली झाली. त्यामुळे सेन्सेक्सला मिळविलेला लाभ गमवावा लागला.
मध्यम आणि छोट्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणावर खरेदी दिसून आली. दोन्ही वर्गातील कंपन्यात १.३ टक्क्यांची तेजी दिसून आली. ब्ल्यूचिप कंपन्यांपेक्षा याच कंपन्यांची आज चलती राहिली. ब्ल्यूचिप कंपन्यांनी अवघी ०.०४ टक्क्यांनी वाढ नोंदविली. गेल्या दोन सत्रांत शेअर बाजाराने मोठी उसळी घेतली होती. गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केली. आज तिसऱ्या दिवशी मात्र गुंतवणूकदार जरासे सावध पवित्र्यात असल्याचे दिसून आले. त्यामुळेच आज नफा वसुलीला महत्त्व आल्याने ब्रोकरांनी सांगितले.
टीसीएस आणि बजाजच्या तिमाही कामगिरीचे आकडे जाहीर झाल्यानंतर बाजारात तेजीचे वातावरण निर्माण झाले होते. सकाळी सेन्सेक्स तेजीसह २५,५४०.९२ अंकावर उघडला. नंतर तो २५,६१३.०३ अंकांपर्यंत वर गेला. नंतर मात्र तो जरासा खाली आला. दिवस अखेरीस ११.४४ अंकांच्या वाढीसह अथवा ०.०४ टक्क्यांच्या वाढीसह २५,५६१.१६ अंकावर बंद झाला. ही सेन्सेक्सची ८ जुलैनंतरची सर्वांत मजबूत स्थिती आहे. त्या दिवशी सेन्सेक्स २५,५८२.११ अंकांवर बंद झाला होता.
गेल्या दोन सत्रांत सेन्सेक्सने ५४३ अंकांची कमाई केली आहे. अर्थव्यवस्थेची सकारात्मक आकडेवारी आणि रिझर्व्ह बँकेने पायाभूत क्षेत्रासाठी सैल केलेले फायनान्सिंग नियम यामुळे शेअर बाजारात टॉनिक मिळाले आहे.
बजाज आॅटोचा शेअर २ टक्क्यांनी कोसळला. बजाजच्या तिमाही कामगिरीत नफा वाढला असला, तरी वाढीचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे हा फटका कंपनीला बसला. टीसीएसच्या शेअर्समध्ये ०.८ टक्क्यांची घसरण झाली.
सेन्सेक्समध्ये समावेश असलेल्या ३० पैकी १७ कंपन्यांचे शेअर्स आज वर चढले. हिंदाल्कोचा शेअर सर्वाधिक ३.९१ टक्क्यांनी वर चढला. त्यापोठापाठ टाटा पॉवर ३.५३ टक्के, टाटा स्टील २.९९ टक्के आणि कोल इंडिया २.८६ टक्के अशी तेजी राहिली. १३ कंपन्यांचे शेअर्स कोसळले. सर्वाधिक ३.१८ टक्क्यांचा फटका एमअँडएमला बसला. त्यापाठोपाठ बजाज आॅटो, गेल आणि टीसीएस यांचा क्रमांक लागला. (प्रतिनिधी)
सेन्सेक्स आठवड्याच्या उच्चांकावर
सलग तिसऱ्या दिवशी तेजी दर्शविणारा सेन्सेक्स ११.४४ अंकांनी वर चढून २५,५६१.१६ अंकावर बंद झाला. सेन्सेक्सचा हा एक आठवड्याचा उच्चांक ठरला आहे
By admin | Updated: July 18, 2014 02:00 IST2014-07-18T02:00:27+5:302014-07-18T02:00:27+5:30
सलग तिसऱ्या दिवशी तेजी दर्शविणारा सेन्सेक्स ११.४४ अंकांनी वर चढून २५,५६१.१६ अंकावर बंद झाला. सेन्सेक्सचा हा एक आठवड्याचा उच्चांक ठरला आहे
