मुंबई : कोळसा क्षेत्रातील सुधारणांच्या घोषणेमुळे ऊर्जा, धातू व बँकिंग शेअर्समधील तेजीच्या पार्श्वभूमीवर मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज १४६ अंकांनी मजबूत होऊन एक आठवड्याच्या उच्चांकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही ४८ अंकांच्या वाढीसह ७,९०० अंकांवर बंद झाला.
बाजार विश्लेषकांच्या मते, मागणी व विदेशी भांडवल प्रवाह यामुळे युरोपीय बाजार तेजीसह उघडल्याने बाजार मजबूत झाला. बांधकाम, ऊर्जा, धातू, भांडवली वस्तू, बँकीग व ग्राहकोपयोगी टिकाऊ वस्तू या क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये मजबूत कल दिसून आला.
ऊर्जा क्षेत्रातील सुधारणेच्या दृष्टीने महत्त्वपुर्ण पाऊल उचलत मंत्रीमंडळाने कोळसा खाणींच्या लिलावाबाबत धोरणात्मक निर्णय घेतला. खासगी कंपन्यांच्या वापरासाठी कोळसा खामींचा ई-लिलाव व राज्य व केंद्रीय सरकारी कंपन्यांना थेट खाणींचे वाटप करण्यासाठी अध्यादेश आणण्यासाठी राष्ट्रपतींना शिफारस करण्याचा निर्णय मंत्रीमंडळाने घेतला. सोमवारी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत हा निर्णय झाला.
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही ४८.३५ अंक वा ०.६१ टक्क्यांनी वधारुन ७,९२७.२५ अंकावर बंद झाला. दिवसभरात निफ्टी ७,९३६.६० ते ७,८७४.३५ अंक यादरम्यान राहिला. (प्रतिनिधी)
सेन्सेक्स आठवड्याच्या उच्चांकावर
कोळसा क्षेत्रातील सुधारणांच्या घोषणेमुळे ऊर्जा, धातू व बँकिंग शेअर्समधील तेजीच्या पार्श्वभूमीवर मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज १४६ अंकांनी मजबूत होऊन एक आठवड्याच्या उच्चांकावर बंद झाला
By admin | Updated: October 22, 2014 05:30 IST2014-10-22T05:30:19+5:302014-10-22T05:30:19+5:30
कोळसा क्षेत्रातील सुधारणांच्या घोषणेमुळे ऊर्जा, धातू व बँकिंग शेअर्समधील तेजीच्या पार्श्वभूमीवर मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज १४६ अंकांनी मजबूत होऊन एक आठवड्याच्या उच्चांकावर बंद झाला
