मुंबई : दिवसभर तेजीत असलेले शेअर बाजार गुरुवारी सत्राच्या अखेरीस झालेल्या जोरदार विक्रीमुळे धडाधड कोसळले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स प्रारंभी ३५0 अंकांनी वाढला होता. तथापि, नंतर त्याने ही सर्व वाढ गमावली. सत्रअखेरीस तो १५२.४५ अंकांनी घसरला.
३0 कंपन्यांच्या समभागांचा समावेश असलेला सेन्सेक्स सकाळी २८,८0५.२२ अंकांवर तेजीसह उघडला होता. त्यानंतर तो आणखी वर चढून २८,९७८.७४ अंकांपर्यंत वर चढला. त्यानंतर बाजारात अचानक नफा वसुलीचे सत्र सुरू झाले. त्यामुळे सेन्सेक्स २८,४११.७0 अंकांपर्यंत खाली घसरला. सत्रअखेरीस तो २८,४६९.६७ अंकांवर बंद झाला. १५२.४५ अंक अथवा 0.५३ टक्क्यांची वाढ त्याने नोंदविली.
राष्ट्रीय शेअर बाजाराचा सीएनएक्स निफ्टी ५१.२५ अंक अथवा 0.५९ टक्क्यांनी घसरून ८,६३४.६५ अंकांवर बंद झाला. अॅक्सिस बँक, एसबीआय, आयसीआयसीआय बँक, भेल, आरआयएल आणि आयटीसी या कंपन्यांत मोठ्या प्रमाणात विक्री दिसून आली. त्याचा मोठा फटका निर्देशांकांना बसला. आशियाई बाजारांपैकी चीन, हाँगकाँग, तैवान, सिंगापूर आणि दक्षिण कोरिया येथील बाजार 0.१४ टक्के ते १.४५ टक्के वर चढले. जपानचा निक्केई मात्र तब्बल २२५ अंकांनी अथवा 0.३५ टक्क्यांनी घसरला. युरोपीय बाजारात सकाळी तेजी दिसून आली.
४सेन्सेक्समध्ये समावेश असलेल्या ३0 कंपन्यांपैकी २१ कंपन्यांचे समभाग घसरले.
४घसरणीचा फटका बसलेल्या कंपन्यांत अॅक्सिस बँक, एसबीआय, रिलायन्स इंडस्ट्रीज, सेसा स्टरलाईट, आयसीआयसीआय बँक, भेल, टाटा मोटर्स, टाटा पॉवर, एचडीएफसी बँक, आयटीसी आणि एलअँडटी यांचा समावेश आहे.
४या उलट गेल इंडिया, एनटीपीसी, टाटा स्टील आणि टीसीएस या कंपन्यांचे समभाग वर चढले.
४मीडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक अनुक्रमे 0.५९ टक्के आणि 0.५८ टक्के घसरले.
४बाजाराची एकूण व्याप्ती कमजोर राहिली. १,७३0 कंपन्यांचे समभाग घसरले. १,१0४ कंपन्यांचे समभाग वर चढले. १२७ कंपन्यांचे समभाग स्थिर राहिले. बाजाराची एकूण उलाढाल वाढून ३,८३५.३१ कोटी झाली. आदल्या दिवशी ती ३,६६४.३६ कोटी होती.
सेन्सेक्स वाढता वाढता घसरला
दिवसभर तेजीत असलेले शेअर बाजार गुरुवारी सत्राच्या अखेरीस झालेल्या जोरदार विक्रीमुळे धडाधड कोसळले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स प्रारंभी ३५0 अंकांनी वाढला होता.
By admin | Updated: March 19, 2015 23:20 IST2015-03-19T23:20:53+5:302015-03-19T23:20:53+5:30
दिवसभर तेजीत असलेले शेअर बाजार गुरुवारी सत्राच्या अखेरीस झालेल्या जोरदार विक्रीमुळे धडाधड कोसळले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स प्रारंभी ३५0 अंकांनी वाढला होता.
