मुंबई : इराकचा प्रश्न अधिकच चिघळल्यामुळे, भारताच्या अर्थव्यवस्थेला धक्का बसेल या भीतीने मुंबई शेअरबाजाराचा सेन्सेक्स बुधवारी २७५ अंकांनी घसरला. महागाई व विकासाचा वेग मंदावणे हे घटकही निर्देशांकाच्या घसरणीला कारणीभूत ठरले आहेत.
इराकमधील प्रमुख तेल रिफायनरीवर बुधवारी पहाटे दहशतवाद्यांनी हल्ला केला, हे वृत्त येताच बाजाराला धक्का बसला. त्यामुळे दुपारी निर्देशांक ४०० अंकांनी कोसळला. न्यूयॉर्कमध्ये तेल व्यापारात कच्च्या तेलाच्या जुलैमधील किमती ४१ सेंटने वाढून बॅरलमागे १०६.७७ डॉलर झाल्या. परदेशी भांडवलाचा ओघही मंदावला व रुपयाची किंमत घसरून डॉलरमागे ६०.४० पर्यंत खाली आली. मुंबई शेअरबाजाराच्या १२ सेक्टरल इंडेक्सपैकी ११ इंडेक्सचे ०.७२ टक्के ते २.१० टक्क्यांच्या दरम्यान नुकसान झाले. रियल्टी, तेल व गॅस, ऊर्जा, कंझ्युमर ड्युरेबल, बँकिंग, आॅटो व आयटी सेक्टरचे शेअर्स जोरदार घसरले. हेल्थकेअर शेअर्सना मात्र वाढले.
मुंबई शेअरबाजाराचा ३० शेअर्सचा निर्देशांक दुपारपर्यंत चांगला चालला. २५,११४.३०पर्यंत घसरून परत २५,२४६.२५ पर्यंत वाढला. एकूण घसरण २७४.९४ अंकांची व १.०८ टक्के होती. मंगळवारी निर्देशांक ३३०.७१ अंकांनी व १.३१ टक्के वाढला होता.
व्हेरासिटी ब्रोकिंग सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख जिग्नेश चौधरी यांच्यामते तेलाच्या किमती वाढतील व महागाई आणखी भडकेल अशी भीती वाटत आहे, भारत ८० टक्के तेल आयात करतो, व तेलाच्या किमती वाढल्यास आपोआप महागाई वाढते. मे महिन्यात महागाई ६.०१ पर्यंत वाढली असून, पाच महिन्यांच्या उच्चांकावर गेली आहे. महागाईवर नियंत्रण आणण्यासाठी सरकार अनेक उपाय योजत आहे, असे सरकारी सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)
इराकमधील संकटामुळे सेन्सेक्सची घसरण
इराकचा प्रश्न अधिकच चिघळल्यामुळे, भारताच्या अर्थव्यवस्थेला धक्का बसेल या भीतीने मुंबई शेअरबाजाराचा सेन्सेक्स बुधवारी २७५ अंकांनी घसरला
By admin | Updated: June 19, 2014 04:32 IST2014-06-19T04:32:35+5:302014-06-19T04:32:35+5:30
इराकचा प्रश्न अधिकच चिघळल्यामुळे, भारताच्या अर्थव्यवस्थेला धक्का बसेल या भीतीने मुंबई शेअरबाजाराचा सेन्सेक्स बुधवारी २७५ अंकांनी घसरला
