Lokmat Money > बिझनेस न्यूज > सेन्सेक्स ४३ अंकांनी घसरला

सेन्सेक्स ४३ अंकांनी घसरला

उद्यापासून सुरू होत असलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी सावध खेळी करताना खरेदीत आखडता हात घेतला.

By admin | Updated: July 21, 2015 00:09 IST2015-07-21T00:09:17+5:302015-07-21T00:09:17+5:30

उद्यापासून सुरू होत असलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी सावध खेळी करताना खरेदीत आखडता हात घेतला.

Sensex slipped 43 points | सेन्सेक्स ४३ अंकांनी घसरला

सेन्सेक्स ४३ अंकांनी घसरला

मुंबई : उद्यापासून सुरू होत असलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी सावध खेळी करताना खरेदीत आखडता हात घेतला. त्यामुळे मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ४३ अंकांनी घसरून २८,४२0.१२ अंकांवर बंद झाला.
बाजारातील सूत्रांनी सांगितले की, जमीन अधिग्रहण आणि वस्तू व सेवा कर यांसारखी महत्त्वाची विधेयके संसदेत अडकून पडलेली आहेत. यावर येत्या अधिवेशनात नेमक्या काय घडामोडी होतात, याची गुंतवणूकदारांना प्रतीक्षा आहे.
सेन्सेक्स सकाळी २८,५४४.२८ अंकांवर तेजीसह उघडला होता. त्यानंतर मात्र तो प्रचंड घसरला. एका क्षणी २८,३१९.८३ अंकांपर्यंत खाली आला. दुपारच्या सत्रात काही निवडक कंपन्यांत खरेदी झाली. त्यामुळे घसरण भरून निघाली. तरीही सेन्सेक्स घसरणीसह २८,४२0.१२ अंकांवर बंद झाला. ४३.१९ अंक आणि 0.१५ टक्क्यांची घसरण सेन्सेक्सने नोंदविली.
सेन्सेक्समध्ये समावेश असलेल्या ३0 पैकी १९ कंपन्यांचे समभाग घसरले. ११ कंपन्यांचे समभाग वर चढले.
५0 कंपन्यांचा समावेश असलेला व्यापक आधारावरील निफ्टी ६.४0 अंकांनी अथवा 0.0७ टक्क्यांनी वाढून ८,६0३.४५ अंकांवर बंद झाला. त्या आधी तो ८,६२४.१0 आणि ८,५५९ अंकांच्या मध्ये हेलकावताना दिसून आला. घसरणीचा फटका बसलेल्या बड्या कंपन्यांत टाटा मोटर्स, वेदांता, एसबीआय, एचयूएल, भेल, कोल इंडिया, एचडीएफसी यांचा समावेश आहे. क्षेत्रनिहाय विचार करता रिअल्टी, तेल व गॅस, धातू आणि ऊर्जा या क्षेत्रातील समभाग घसरले.
व्यापक पातळीवर मात्र बाजारात वाढ दिसून आली. बीएसई स्मॉलकॅप 0.४0 टक्क्यांनी, तर मीडकॅप 0.२७ टक्क्यांनी वर चढला.
बाजाराची एकूण व्याप्ती मजबूत झाल्याचे दिसून आले. १,५४५ कंपन्यांचे समभाग वाढले. १,२७८ कंपन्यांचे समभाग घसरले. १0५ कंपन्यांचे समभाग स्थिर राहिले. बाजारातील एकूण उलाढाल मात्र घसरून २,७७५.९५ कोटी झाली. शुक्रवारी ती २,९४४.८५ कोटींवर होती. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Sensex slipped 43 points

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.