Lokmat Money > बिझनेस न्यूज > सेन्सेक्स सलग दुसऱ्या दिवशी वाढला

सेन्सेक्स सलग दुसऱ्या दिवशी वाढला

वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) विधेयक संसदेच्या हिवाळी अधिवेशनात मंजूर करण्यासाठी सरकारने पावले उचलल्यामुळे निर्माण झालेल्या सकारात्मक वातावरणाचा योग्य परिणाम शेअर बाजारावर दिसून येत

By admin | Updated: November 28, 2015 00:02 IST2015-11-28T00:02:26+5:302015-11-28T00:02:26+5:30

वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) विधेयक संसदेच्या हिवाळी अधिवेशनात मंजूर करण्यासाठी सरकारने पावले उचलल्यामुळे निर्माण झालेल्या सकारात्मक वातावरणाचा योग्य परिणाम शेअर बाजारावर दिसून येत

The Sensex rose for the second consecutive day | सेन्सेक्स सलग दुसऱ्या दिवशी वाढला

सेन्सेक्स सलग दुसऱ्या दिवशी वाढला

मुंबई : वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) विधेयक संसदेच्या हिवाळी अधिवेशनात मंजूर करण्यासाठी सरकारने पावले उचलल्यामुळे निर्माण झालेल्या सकारात्मक वातावरणाचा योग्य परिणाम शेअर बाजारावर दिसून येत आहे. शुक्रवारी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १७0 अंकांनी वाढून २६,१२८.२0 अंकांवर बंद झाला. हा ३ आठवड्यांचा उच्चांक ठरला आहे.
संपलेल्या सप्ताहात बीएसई सेन्सेक्स २५९.७१ अंकांनी अथवा १ टक्क्याने वाढला, तसेच राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी या सप्ताहात ८६.१५ अंकांनी अथवा १.0९ टक्क्यांनी वाढला. बँकिंग, कॅपिटल गुडस्, मेटल, पीएसयू, आयटी आणि रिअल्टी या क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांनी चांगली कामगिरी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि काँग्रेस नेते मनमोहनसिंग यांना चहाचे निमंत्रण दिल्यामुळे जीएसटी विधेयकाबाबत आणखी आशा निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे बाजारात जोरदार खरेदी झाली. सेन्सेक्स १६९.५७ अंकांनी अथवा 0.६५ टक्क्यांनी वाढून २६,१२८.२0 अंकांवर बंद झाला. ६ नोव्हेंबर रोजी सेन्सेक्स या पातळीवर होता. गेल्या दोन सत्रांत सेन्सेक्सने ३५२.४६ अंक कमावले आहेत.
व्यापक आधारावरील राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ७,९00 अंकांचा टप्पा ओलांडून वर चढला आहे. ७,९४२.७0 अंकांवर बंद होताना त्याने ५८.९0 अंकांची वाढ मिळविली. ती 0.७५ टक्के आहे.
बँकिंग क्षेत्राचा निर्देशांक सर्वाधिक १.८६ टक्क्यांनी वाढला. त्यापाठोपाठ कॅपिटल गुडस्, पीएसयू, आयटी, मेटल आणि रिअल्टी या क्षेत्रांचे समभाग वाढले. कंझुमर ड्युरेबल्स, आॅईल अँड गॅस, आॅटो या क्षेत्रांचे निर्देशांक मात्र १.३८ टक्क्यांनी घसरले. सेन्सेक्समधील ३0 पैकी २२ कंपन्यांचे समभाग वाढले. ८ कंपन्यांचे समभाग घसरले. हिंदाल्कोचा समभाग सर्वाधिक ३.२६ टक्क्यांनी वाढला. त्याखालोखाल सरकारी मालकीच्या एसबीआयचे समभाग वाढले. एलअँडटी, आयसीआयसीआय बँक, वेदांता, भेल, टाटा स्टील, एचडीएफसी बँक, सिप्ला आणि इन्फोसिस यांचे समभागही वर चढले.
व्यापक बाजारातही तेजीचा कल दिसून आला. मीडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक 0.४६ टक्क्यांपर्यंत वाढले.
तत्पूर्वी, काल विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी ३९८.१0 कोटी रुपयांचे समभाग विकल्याचे हंगामी आकडेवारीवरून समोर आले. (वृत्तसंस्था)

Web Title: The Sensex rose for the second consecutive day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.