मुंबई : मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स बुधवारी ३७४ अंकांनी उसळून पुन्हा एकदा २७ हजार अंकांच्या वर पोहोचला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही १0८ अंकांनी वाढला.
बँका, ग्राहक वस्तू आणि वाहन या क्षेत्रांत मोठी खरेदी दिसून आली. उतरलेला महागाईचा पारा तसेच कारखाना उत्पादनाची आकडेवारी याचा सुयोग्य परिणाम बाजारावर झाल्याचे दिसून आले. दुसरीकडे डॉलरच्या तुलनेत रुपयाची झालेली सुधारणा आणि जागतिक बाजारातील उत्साहवर्धक कल या बाबीही शेअर बाजारांच्या वाढीला उपकारक ठरल्या. काल सेन्सेक्स ६३0 अंकांनी वाढला होता.
एचएसबीसीने भारताच्या जीडीपी वाढीच्या दराबाबत नकारत्मक भाकीत केले असतानाही बुधवारी सेन्सेक्स वाढला. दुपारच्या सत्रात सेन्सेक्सने उसळी घेतली. ३७३.६२ अंक अथवा १.३९ टक्के वाढ नोंदवून सेन्सेक्स २७,२५१.१0 अंकांवर बंद झाला.
५0 कंपन्यांच्या व्यापक आधारावरील राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १0८.५0 अंकांनी अथवा १.२४ टक्क्यांनी वाढून ८,२३५.४५ अंकांवर बंद झाला. गुरुवारी ठोक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई निर्देशांकाची एप्रिलमधील आकडेवारी जाहीर होणार आहे. या आकडेवारीची बाजाराला आता प्रतीक्षा आहे.
सेन्सेक्समध्ये समावेश असलेल्या ३0 कंपन्यांपैकी २२ कंपन्यांचे समभाग तेजीत होते. बाजारातील एकूण कंपन्यांपैकी १,६३९ कंपन्यांचे समभाग घसरले. १,0५९ कंपन्यांचे समभाग घसरले. ११८ कंपन्यांचे समभाग स्थिर राहिले. बाजारातील एकूण उलाढाल वाढून ३,५४५.२८ कोटी रुपये राहिली. आदल्या सत्रात ती ३,१४२.७0 कोटी होती.
बाजारातील सूत्रांनी सांगितले की, तेजीचा लाभ मिळालेल्या कंपन्यांत अॅक्सिस बँक, गेल, आयसीआयसीआय बँक, एसबीआय, एमअॅण्डएम, एचडीएफसी, भेल, टाटा पॉवर आणि लार्सन यांचा समावेश आहे. हिंदाल्को, एनटीपीसी आणि भारती एअरटेल यांचे समभागही घसरले आहे. (वृत्तसंस्था)
सेन्सेक्स ३७४ अंकांनी उसळला
मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स बुधवारी ३७४ अंकांनी उसळून पुन्हा एकदा २७ हजार अंकांच्या वर पोहोचला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही १0८ अंकांनी वाढला.
By admin | Updated: May 14, 2015 00:18 IST2015-05-14T00:18:16+5:302015-05-14T00:18:16+5:30
मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स बुधवारी ३७४ अंकांनी उसळून पुन्हा एकदा २७ हजार अंकांच्या वर पोहोचला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही १0८ अंकांनी वाढला.
