Lokmat Money > बिझनेस न्यूज > सेन्सेक्स ३३0 अंकांनी उसळला

सेन्सेक्स ३३0 अंकांनी उसळला

जागतिक बाजारातील तेजीचा लाभ मिळाल्याने भारतीय शेअर बाजार सोमवारी पुन्हा एकदा उसळले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ३३0 अंकांनी वाढून

By admin | Updated: December 23, 2014 00:33 IST2014-12-23T00:33:53+5:302014-12-23T00:33:53+5:30

जागतिक बाजारातील तेजीचा लाभ मिळाल्याने भारतीय शेअर बाजार सोमवारी पुन्हा एकदा उसळले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ३३0 अंकांनी वाढून

Sensex rose by 330 points | सेन्सेक्स ३३0 अंकांनी उसळला

सेन्सेक्स ३३0 अंकांनी उसळला

मुंबई : जागतिक बाजारातील तेजीचा लाभ मिळाल्याने भारतीय शेअर बाजार सोमवारी पुन्हा एकदा उसळले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ३३0 अंकांनी वाढून २७,७0१.७९ अंकांवर बंद झाला. तेजीचा हा सलग तिसरा दिवस होता.
३0 कंपन्यांच्या शेअर्सचा समावेश असलेला सेन्सेक्स सकाळी तेजीने उघडला. सत्र अखेरीस सेन्सेक्स २७,७0१.७९ अंकांवर बंद झाला. आदल्या दिवशीच्या तुलनेत ३२९.९५ अंकांची वाढ त्याने मिळविली. ही वाढ १.२१ टक्के आहे. गेल्या तीन दिवसांपासून सेन्सेक्स उत्तम कामगिरी करीत आहे. तीन दिवसांत तो ९९१.६६ अंकांनी अथवा ३.७१ टक्क्यांनी वाढला. ५0 कंपन्यांचा समावेश असलेला एनएसईचा निफ्टी ९८.८0 अंकांनी अथवा १.२0 टक्क्यांनी वाढून ८,३२४.00 अंकांवर बंद झाला. आजच्या वाढीने निफ्टीला ८,३00 अंकांचा टप्पा ओलांडणे शक्य झाले.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किमती वाढून प्रतिबॅरल ६२ डॉलर झाल्या आहेत.
यंदाच्या वर्षाच्या उरलेल्या काळासाठी तेल ६२ डॉलरच्या वरच विकण्यावर जागतिक सहमती झाली आहे. त्याचा सुयोग्य परिणाम बाजारावर दिसून आला. मुंबई शेअर बाजारातील सर्व १२ क्षेत्रांत तेजीचा प्रभाव जाणवला. 0.१३ टक्के ते १.४८ टक्क्यांपर्यंत तेजी दिसून आली.
दरम्यान, शुक्रवारी विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी ६६८.८५ कोटींची समभाग विक्री केली. बाजारात उपलब्ध करून देण्यात आलेल्या हंगामी आकडेवारीतून ही माहिती समोर आली.
आजच्या तेजीचा सर्वाधिक लाभ मिळालेल्या कंपन्यांत एमअँडएम, कोल इंडिया, एचडीएफसी, भेल, गेल आणि एनटीपीसी यांचा समावेश आहे. एचडीएफसी बँक, ओएनजीसी, भारती एअरटेल, हीरो मोटोकॉर्प, टाटा मोटर्स, एचयूएल, अ‍ॅक्सिस बँक, आयटीसी, एसएसएलटी, एसबीआयएन आणि मारुती यांनाही तेजीचा लाभ मिळाला. हिंदाल्को, लार्सन आणि टाटा स्टील यासारख्या काही कंपन्यांचे समभाग घसरले.

Web Title: Sensex rose by 330 points

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.