मुंबई : जागतिक बाजारातील तेजी आणि स्थानिक बाजारांत वाढलेली मागणी या बळावर मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १४५ पेक्षा जास्त अंकांनी वाढला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही ४0 पेक्षा जास्त अंकांनी वर चढला.
३0 कंपन्यांचा समावेश असलेला सेन्सेक्स १४५.४७ अंकांनी अथवा 0.५२ टक्क्यांनी वाढून २८,१२९.८४ अंकांवर बंद झाला. हा दोन आठवड्यांचा उच्चांक ठरला. ५ आॅक्टोबर रोजी सेन्सेक्स २८,२२0.९८ अंकांवर बंद झाला होता. त्यानंतरचा सर्वोच्च बंद त्याने आज नोंदवला. ५0 कंपन्यांचा समावेश असलेला निफ्टी ८,६९९.४0 अंकांवर बंद झाला. ४0.३0 अंक अथवा 0.४७ टक्के वाढ त्याने मिळविली.
सेन्सेक्समधील ३0 पैकी १९ कंपन्यांचे समभाग वाढले. येस बँकेचा समभाग १.३१ टक्क्यांनी वाढला. बँकेच्या नफ्यात ३१.३ टक्के वाढ झाल्याने समभाग तेजाळला. आयसीआयसीआय बँकेचा समभाग ४.७२ टक्क्यांनी, तर एसबीआयचा समभाग २.0२ टक्क्यांनी वाढला. इन्फोसिस आणि विप्रो या सॉफ्टवेअर निर्यातदार कंपन्यांचे समभाग मात्र घसरले. लुपीन, हिंदुस्तान युनिलिव्हर, टाटा मोटर्स, सन फार्मा, एचडीएफसी बँक, आयटीसी, एशियन पेंट्स, एमअँडएम, एनटीपीसी यांचे समभाग घसरले. व्यापक बाजारांत तेजी अधिक प्रमाणात कार्यरत असल्याचे दिसून आले. मीडकॅप 0.0६ टक्क्यांनी, तर स्मॉलकॅप 0.५0 टक्क्यांनी वाढला.
आशियाई बाजारांत तेजीचे वातावरण राहिले. जपानचा
निक्केई, तसेच हाँगकाँग, सिंगापूर, दक्षिण कोरिया आणि तैवान
येथील बाजार १.३९ टक्क्यांपर्यंत वाढले. युरोपीय बाजारांतही सकाळी तेजी दिसून आली. फ्रान्स आणि जर्मनी येथील बाजार 0.२0 टक्क्यांपर्यंत तेजी दर्शवित होते. ब्रिटनचा बाजार मात्र, 0.0७ टक्क्यांनी खाली चालत होता. (प्रतिनिधी)
सेन्सेक्स वधारला
जागतिक बाजारातील तेजी आणि स्थानिक बाजारांत वाढलेली मागणी या बळावर मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १४५ पेक्षा जास्त अंकांनी वाढला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही
By admin | Updated: October 21, 2016 03:20 IST2016-10-21T03:20:26+5:302016-10-21T03:20:26+5:30
जागतिक बाजारातील तेजी आणि स्थानिक बाजारांत वाढलेली मागणी या बळावर मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १४५ पेक्षा जास्त अंकांनी वाढला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही
