Lokmat Money > बिझनेस न्यूज > सेन्सेक्स वधारला

सेन्सेक्स वधारला

जागतिक बाजारात अनुकूल वातावरण असल्याची जाणीव होताच मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी सेन्सेक्स ४५ अंकांनी वधारून २६,0७९.४८ वर बाजार बंद झाला. दिवसभर बाजारात चढ-उतार

By admin | Updated: December 30, 2015 01:40 IST2015-12-30T01:40:08+5:302015-12-30T01:40:08+5:30

जागतिक बाजारात अनुकूल वातावरण असल्याची जाणीव होताच मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी सेन्सेक्स ४५ अंकांनी वधारून २६,0७९.४८ वर बाजार बंद झाला. दिवसभर बाजारात चढ-उतार

Sensex rose | सेन्सेक्स वधारला

सेन्सेक्स वधारला

मुंबई : जागतिक बाजारात अनुकूल वातावरण असल्याची जाणीव होताच मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी सेन्सेक्स ४५ अंकांनी वधारून २६,0७९.४८ वर बाजार बंद झाला. दिवसभर बाजारात चढ-उतार होत राहिले. वाहन आणि बँकिंग शेअर्सना मागणी वाढल्याने बाजार स्थिर झाला.
वर्ष संपत आले आहे. त्यामुळे बहुतेक विदेशी संस्था गुंतवणूकदार बाजारापासून दूर राहिल्या. त्याचबरोबर अन्य भागीदारांनी खरेदीत फारसा रस दाखविला नाही.
डेरिव्हेटिव्हज् भागात डिसेंबरच्या समाप्तीपूर्वी सट्टेबाजांनी आपले प्रलंबित सौदे निकाली काढण्यासाठी खरेदी केल्याने बाजारात तेजी आली; मात्र गुंतवणूकदारांनी सावधानता बाळगली, असे व्यावसायिकांनी सांगितले.
३0 शेअर्सचा समावेश असलेला निर्देशांक ४५.३५ अंकांनी म्हणजे 0.१७ टक्क्यांनी वधारून २६,0७९.४८ वर बंद झाला. सोमवारी सेन्सेक्स १९५.४२ अंकांनी वधारला होता. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा ५0 शेअर्सचा निफ्टीसुद्धा ३.८0 अंकांनी म्हणजे 0.0५ टक्क्यांनी वधारून ७,९२८.९५ अंकांवर बंद झाला.
बीएनपी, परिबा म्युच्युअल फंडाचे प्रबंधक (शेअर) श्रेयश देवालकर म्हणाले की, युरोपीय बाजारात असलेल्या तेजीच्या बाजारावर सकारात्मक परिणाम झाला; मात्र खनिज तेलाच्या घसरत्या किमतीने ऊर्जाविषयक शेअरवर परिणाम झाला. (वृत्तसंस्था)

Web Title: Sensex rose

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.