Lokmat Money > बिझनेस न्यूज > सेन्सेक्स वधारला

सेन्सेक्स वधारला

जागतिक बाजारात असलेल्या अनुकूल वातावरणामुळे बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार १७४ अंकांनी वधारला. अमेरिकी फेडरल बँक व्याजदर वाढविण्याची शक्यता

By admin | Updated: December 17, 2015 00:33 IST2015-12-17T00:33:16+5:302015-12-17T00:33:16+5:30

जागतिक बाजारात असलेल्या अनुकूल वातावरणामुळे बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार १७४ अंकांनी वधारला. अमेरिकी फेडरल बँक व्याजदर वाढविण्याची शक्यता

Sensex rose | सेन्सेक्स वधारला

सेन्सेक्स वधारला

मुंबई : जागतिक बाजारात असलेल्या अनुकूल वातावरणामुळे बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार १७४ अंकांनी वधारला. अमेरिकी फेडरल बँक व्याजदर वाढविण्याची शक्यता असूनही गुंतवणूकदारांनी जोरदार खरेदी केली.
आज दिवसअखेर बीएसईचा सेन्सेक्स १७३.९३ अंकांनी वधारून २५,४९७.३७ अंकांवर बंद झाला. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा ‘निफ्टी’सुद्धा वधारून ७,७५० वर बंद झाला. प्रस्तावित जीएसटीत १८ टक्क्यांपेक्षा कर राहणार नाही आणि एक टक्का अतिरिक्त कर रद्द करण्याचे आश्वासन वित्तमंत्री अरुण जेटली यांनी दिले. त्याचाही बाजारावर अनुकूल परिणाम झाला. अमेरिकेच्या फेडरल बँकेची दोन दिवस चालणारी बैठक गुरुवारी पहाटे सुरू होत असून, त्यात व्याजदर वाढीचा निर्णय अपेक्षित आहे.

Web Title: Sensex rose

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.