मुंबई : ३० शेअर्स असणारा मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २९,७८३.३२ या उच्चांकावर आज पोहोचला; पण ही बढत कायम राहू शकली नाही. दिवसभराच्या उलाढालीत सेन्सेक्स ११.८६ अंकांनी घसरला असून, २९,५५८.१८ अंकांवर बंद झाला.
अमेरिकेच्या फेडरल बँकेच्या बैठकीचे निष्कर्ष अद्याप बाहेर न आल्याने कॅपिटल गुड्स व मेटल आणि आॅटो शेअर्सना नफेखोरीचा फटका बसला.
वायदे बाजारातील निकालांची मुदत गुरुवारी संपत असल्यानेही गुंतवणूकदार नरम होते. आठ दिवसांत शेअर बाजार २,२०० अंकांनी वाढल्यानंतर गुंतवणूकदारानी थोडा पैसा बाहेर काढला आहे.
मात्र, निफ्टी बाजार अजूनही चढता असून बुधवारी दिवसभरात या निर्देशांकात ३.८० अंकांनी वाढ झाली आहे.
ही वाढ ०.०४ टक्का आहे. दिवसभराच्या उलाढालीत निफ्टी निर्देशांक ८,९८५.०५ च्या उच्चांकावर गेला; पण नंतर ८,९१४.३० अंकावर बंद झाला. गेल्या ९ दिवसांत निफ्टीत ६३६.७५ अंकांची वा ७.६९ टक्के भर पडली आहे.
कन्झ्युमर ड्युरेबल्स, रिअल्टी व आयटी ब्लू चीप कंपन्यांचे शेअर्स मजबूत राहिले, त्यामुळे निर्देशांक सकारात्मक राहिला.
जागतिक पातळीवर बाजारांचा प्रवाह मिश्र राहिला. हाँगकाँग, सिंगापूर, जपान व दक्षिण कोरिया येथील निर्देशांक ०.२० ते ०.४७ अंकाने चढते राहिले, तर चीन व तैवान बाजार ०.११ व १.४१ अंकाने घसरले.
मुंबई शेअर बाजारातील ३० अंकांपैकी १७ कंपन्यांचे शेअर्स घसरले, तर १३ कंपन्या मजबूत राहिल्या.
सेन्सेक्स सर्वाधिक उंचीवर चढला; पण घसरलाही
३० शेअर्स असणारा मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २९,७८३.३२ या उच्चांकावर आज पोहोचला; पण ही बढत कायम राहू शकली नाही.
By admin | Updated: January 29, 2015 01:07 IST2015-01-29T01:07:26+5:302015-01-29T01:07:26+5:30
३० शेअर्स असणारा मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २९,७८३.३२ या उच्चांकावर आज पोहोचला; पण ही बढत कायम राहू शकली नाही.
