Lokmat Money > बिझनेस न्यूज > जागतिक तेजीने सेन्सेक्स वाढला

जागतिक तेजीने सेन्सेक्स वाढला

जागतिक पातळीवरील शेअर बाजारांतील तेजीचा लाभ घेत भारतीय शेअर बाजारांनी बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी जोरदार मुसंडी मारली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ४0२ अंकांनी वाढून

By admin | Updated: September 10, 2015 02:09 IST2015-09-10T02:09:17+5:302015-09-10T02:09:17+5:30

जागतिक पातळीवरील शेअर बाजारांतील तेजीचा लाभ घेत भारतीय शेअर बाजारांनी बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी जोरदार मुसंडी मारली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ४0२ अंकांनी वाढून

Sensex rises in global gains | जागतिक तेजीने सेन्सेक्स वाढला

जागतिक तेजीने सेन्सेक्स वाढला

मुंबई : जागतिक पातळीवरील शेअर बाजारांतील तेजीचा लाभ घेत भारतीय शेअर बाजारांनी बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी जोरदार मुसंडी मारली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ४0२ अंकांनी वाढून २५,७१९.५८ अंकांवर बंद झाला. हा सेन्सेक्सचा एका आठवड्याचा उच्चांक ठरला आहे. धातू, जमीनजुमला आणि वाहन या क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांना आलेल्या मागणीच्या बळावर सेन्सेक्सने ही झेप घेतली.
केंद्र सरकारने अनेक सुधारणांची घोषणा केली आहे. रेडिओ लहरी अन्य कंपन्यांना विकण्याची मुभा कंपन्यांना देण्यात आली आहे. याचा लाभ मिळून बाजारातील धारणा मजबूत झाली. याशिवाय वॉल स्ट्रीटवर आणि आशियाई
बाजारांत तेजीचे वातावरण होते. चीनचे बाजार स्थिरावले आहेत, जपानच्या बाजारांनी ७.७१ टक्क्यांची जबरदस्त वाढ मिळविली आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Sensex rises in global gains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.