Lokmat Money > बिझनेस न्यूज > सेन्सेक्सची उसळी

सेन्सेक्सची उसळी

अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने धोरणात्मक व्याजदरात वाढ करताच गुरुवारी सेन्सेक्सने तब्बल ३०९ अंकांनी उसळी घेत २५,८०३.७८ चा टप्पा गाठला. सेन्सेक्स वाढण्याचा हा

By admin | Updated: December 18, 2015 01:45 IST2015-12-18T01:45:10+5:302015-12-18T01:45:10+5:30

अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने धोरणात्मक व्याजदरात वाढ करताच गुरुवारी सेन्सेक्सने तब्बल ३०९ अंकांनी उसळी घेत २५,८०३.७८ चा टप्पा गाठला. सेन्सेक्स वाढण्याचा हा

Sensex rises | सेन्सेक्सची उसळी

सेन्सेक्सची उसळी

मुंबई : अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने धोरणात्मक व्याजदरात वाढ करताच गुरुवारी सेन्सेक्सने तब्बल ३०९ अंकांनी उसळी घेत २५,८०३.७८ चा टप्पा गाठला. सेन्सेक्स वाढण्याचा हा सलग चौथा दिवस होता व गेल्या महिनाभरात त्याने प्रथमच एवढी उसळी घेतली. व्यवहार बंद झाले तो टप्पाही गेल्या दोन आठवड्यांतील उच्चांकी होता. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा (एनएसई) निफ्टीही ७,८०० पातळीवर गेला. ही वृद्धी खरेदीतील वाढ व फेडरल रिझर्व्हने व्याजदरात वाढ केल्यानंतर विदेशात निर्माण झालेला मजबुतीचा कल याचा परिणाम होती. गेल्या दहा वर्षांत फेडरल रिझर्व्हने प्रथमच व्याजदरात वाढ केली. डॉलरचा भावही ६६.४२ रुपये असा वधारल्यामुळे वातावरण उत्साही बनले.
फेडरल रिझर्व्हच्या निर्णयामुळे अपेक्षेप्रमाणे जागतिक बाजारात शेअर्सच्या भावात ०.२५ टक्क्यांनी वाढ झाली. अर्थव्यवस्था बळकट होत असल्याचे हे चिन्ह असून त्यामुळे खरेदीला प्रोत्साहन मिळाल्याचे दलालांनी सांगितले.
बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजचा (बीएसई) सेन्सेक्स १.२१ टक्क्यांनी वाढून (३०९.४१ अंक) २५,८०३.७८ वर गेला. गेला एक महिना सेन्सेक्ससाठी खूपच चांगला ठरला.
बीएसई सेन्सेक्समध्ये टाटा स्टीलची कामगिरी (४.७६ टक्के) चांगली ठरली. वेदांत लिमिटेड व हिंडाल्कोलाही लाभ झाला.
३० शेअर्सपैकी २५ शेअर्सना लाभ झाला. दरम्यान, विदेशी गुंतवणूकदारांनी ५०३.२२ कोटी रुपये किमतीचे शेअर्स बुधवारी विकले.
भविष्यातील कोणतीही व्याजदर वाढ ही क्रमाक्रमाने होईल, असे फेडरल रिझर्व्हने संकेत दिले आहेत. भारतातील बाजार आता आपले लक्ष देशातील परिस्थतीवर केंद्रित करील, कारण संसदेचे हिवाळी अधिवेशन जवळपास वाया जाईल, अशी मोठी शक्यता आहे व पर्यायाने जीएसटी विधेयक संमत व्हायलाही उशीर लागत आहे, असे जीओजीत बीएनपी परिबास फिनान्शियल सर्व्हिसेसचे फंडामेंटल रिसर्च प्रमुख विनोद नायर यांनी सांगितले.

वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) विधेयकावरून निर्माण झालेल्या अनिश्चिततेमध्ये व्यवहारातील भागीदार अडकल्यामुळे काहीवेळ नकारात्मक वातावरण निर्माण झाले होते. गेल्या तीन सत्रांमध्ये ४५० अंकांचा लाभ झाला होता. पन्नास शेअर्स एनएसई निफ्टीने ९३.४५ अंकांची वाढ घेऊन (१.२१ टक्के) ७,८४४.३५ चा टप्पा गाठला. १९ नोव्हेंबरनंतर या दोघांनीही एकाच दिवसात सर्वाधिक वाढ घेतली.

Web Title: Sensex rises

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.