मुंबई : बुधवारी विक्रम संवत २0७0 चा शेअर बाजारात धमाकेदार शेवट झाला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २१२ अंकांनी वाढून एक महिन्याच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. निफ्टीनेही ६८ अंकांची उसळी घेतली. निफ्टीने आज ८ हजार अंकांनाही स्पर्श केला. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार आर्थिक सुधारणांना गती देणार असल्याच्या अपेक्षेने बाजारात तेजीचा प्रकाश अवतरला आहे.
विक्रम संवत २0७0 या वर्षात सेन्सेक्स ५,५४७.८७ अंकांनी वर चढला. आदल्या वर्षाच्या तुलनेत तब्बल २६.१२ अंकांची उसळी सेन्सेक्सने घेतली आहे. गेल्या पाच संवत वर्षांतील हा सर्वाधिक लाभ ठरला आहे. या आधी विक्रम संवत २0६५ या वर्षी सेन्सेक्सने ८,८१३.२६ अंकांची सर्वाधिक वाढ नोंदविली होती. त्या वर्षीची वाढ १0३.५७ टक्के होती. २0७0 या वर्षात बीएसईमध्ये नोंदणीकृत असलेल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना २५ लाख कोटींचा लाभ झाला आहे.
बुधवारी बीएसईच्या सर्व १२ वर्गांतील निर्देशांक तेजीत राहिले. 0.0६ टक्के ते २.९७ टक्क्यांची वाढ त्यांनी नोंदविली. आॅटो, भांडवली वस्तू, औषधी या क्षेत्रांना सर्वाधिक लाभ मिळाला. दुसऱ्या श्रेणीतील कंपन्यांनाही तेजीचा लाभ मिळाला. किरकोळ गुंतवणूकदार बाजाराकडे वळत असल्याचे संकेत त्यातून मिळत आहेत.
ब्रोकरांनी सांगितले की, जागतिक पातळीवर शेअर बाजारांची दमदार वाटचाल सुरू आहे. त्याच बरोबर केंद्र सरकारने आर्थिक सुधारणांची घोषणाही नुकतीच केली आहे. या दोन्हींचा सुयोग्य परिणाम बाजारात दिसून आला.
सेन्सेक्सची सकाळची सुरुवात तेजीने झाली. बाजार तब्बल २00 अंकांच्या तेजीसह उघडला. त्यानंतर तो थोडा घसरला. जवळपास १00 अंकांची घसरण नोंदविल्यानंतर तो पुन्हा वर चढला. दिवसअखेरीस 0.८0 टक्के अथवा २११.५८ अंकांच्या वाढीसह तो २६,७८७.२३ अंकांवर बंद झाला.
या आधी २२ सप्टेंबर रोजी सेन्सेक्स २७,२0६.७४ अंकांवर बंद झाला होता. गेल्या सलग चार सत्रांत सेन्सेक्सने ७८७.८९ अंकांची घसघशीत वाढ दर्शविली आहे. ही वाढ ३.0३ टक्के आहे.
५0 कंपन्यांच्या शेअर्सचा समावेश असलेल्या सीएनएक्स निफ्टीने ६८.१५ अंकांची वाढ अथवा 0.८६ टक्क्यांची वाढ नोंदवून ७,९९५.९0 अंकांचा बंद दिला आहे. हा जवळपास एक महिनाभराचा उच्चांकी बंद ठरला आहे. एका क्षणी निफ्टी ८,00५.00 अंकांपर्यंत वर चढला होता. तथापि, दिवसअखेरीस तो थोडा खाली आला.
बीएसईने जारी केलेल्या तात्पुरत्या आकडेवारीनुसार, विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी आदल्या दिवशी ३२.४0 कोटींची शेअर खरेदी केली.
आशियाई शेअर बाजारांतही आज तेजीचे वातावरण दिसून आले. अॅपलचा उत्साहवर्धक तिमाही निकाल आणि युरोपातील प्रोत्साहन पॅकेजची चर्चा याच्या बळावर अमेरिकेतील शेअर बाजारांनी काल चांगली कामगिरी केली होती. त्याचा उत्तम परिणाम आशियाई बाजारांवर दिसून आला.
हाँगकाँग, जपान, दक्षिण कोरिया, तैवान येथील बाजार १.0९ टक्के ते २.६४ टक्क्यांनी वाढले. युरोपातील बाजारात संमिश्र कल दिसून आला. फ्रान्स आणि ब्रिटनचे बाजार 0.१३ ते 0.२२ टक्क्यांनी खाली आले. जर्मनीचा डॅक्स मात्र तेजीत दिसून आला.
सेन्सेक्स समावेश असलेल्या ३0 पैकी २१ कंपन्यांना तेजीचा लाभ मिळाला. मोठ्या लाभधारकांमध्ये हीरो मोटोकॉर्प, टाटा मोटर्स, मारुती, सिप्ला, बजाज आॅटो, लार्सन आणि एमअँडएम यांचा समावेश होता. डॉ. रेड्डीज लॅब, भेल, रिलायन्स इंडस्ट्रीज, विप्रो, सन फार्मा, एचयूएल या कंपन्यांनाही लाभ मिळाला. ओएनजीसी, आयटीसी, एनटीपीसी आणि कोल इंडिया या कंपन्यांचे शअर्स मात्र घसरले. (प्रतिनिधी)
सेन्सेक्स पुन्हा उसळला
बुधवारी विक्रम संवत २0७0 चा शेअर बाजारात धमाकेदार शेवट झाला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २१२ अंकांनी वाढून एक महिन्याच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला.
By admin | Updated: October 23, 2014 04:59 IST2014-10-23T04:59:03+5:302014-10-23T04:59:03+5:30
बुधवारी विक्रम संवत २0७0 चा शेअर बाजारात धमाकेदार शेवट झाला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २१२ अंकांनी वाढून एक महिन्याच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला.
