Lokmat Money > बिझनेस न्यूज > पतधोरणाच्या पूर्वसंध्येला सेन्सेक्स १३0 अंकांनी तेजीत

पतधोरणाच्या पूर्वसंध्येला सेन्सेक्स १३0 अंकांनी तेजीत

नव्या वर्षातील पहिल्या पतधोरण आढाव्याच्या पूर्वसंध्येला सोमवारी शेअर बाजार तेजाळला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १३0 अंकांनी वाढून २५,३९९.६५ अंकांवर बंद झाला

By admin | Updated: April 5, 2016 00:28 IST2016-04-05T00:28:26+5:302016-04-05T00:28:26+5:30

नव्या वर्षातील पहिल्या पतधोरण आढाव्याच्या पूर्वसंध्येला सोमवारी शेअर बाजार तेजाळला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १३0 अंकांनी वाढून २५,३९९.६५ अंकांवर बंद झाला

Sensex recovered by 130 points on the eve of crores | पतधोरणाच्या पूर्वसंध्येला सेन्सेक्स १३0 अंकांनी तेजीत

पतधोरणाच्या पूर्वसंध्येला सेन्सेक्स १३0 अंकांनी तेजीत

नवी दिल्ली : नव्या वर्षातील पहिल्या पतधोरण आढाव्याच्या पूर्वसंध्येला सोमवारी शेअर बाजार तेजाळला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १३0 अंकांनी वाढून २५,३९९.६५ अंकांवर बंद झाला. रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरात कपात होऊ शकते, असा अंदाज बांधण्यात येत असल्यामुळे बाजारात तेजी अवतरली असल्याचे सूत्रांनी सांगितले.
एका मासिक सर्वेक्षणात वस्तू उत्पादनातील वृद्धी आठ महिन्यांच्या उच्चांकावर गेल्याचे आढळून आले. त्याचा लाभ शेअर बाजारांना झाला. गुंतवणूकदारांनी जोरदार खरेदी केली. पतधोरण आढाव्यात रिझर्व्ह बँकेकडून 0.५0 टक्के व्याजदर कपात केली जाऊ शकते, असे मानले जात आहे. अर्थमंत्री अरुण जेटली यांनीही दरकपातीचा आग्रह जाहीरपणे धरला. त्याचा योग्य परिणाम बाजारावर दिसून आला.
३0 कंपन्यांचा समावेश असलेला सेन्सेक्स सकाळी तेजीसह उघडला होता. त्यानंतर तो २५,४२४.१५ अंकांपर्यंत वर चढला होता. तथापि, नंतर नफा वसुलीचा फटका बसल्याने तो खाली आला. शेवटच्या तासात मात्र बाजारात जोरदार खरेदी झाली. त्या बळावर सेन्सेक्स १३0.0१ अंकांनी अथवा 0.५१ टक्क्यांनी वाढून २५,३९९.६५ अंकांवर बंद झाला. शुक्रवारी सेन्सेक्स ७२ अंकांनी घसरला होता. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ४५.७५ अंकांनी अथवा 0.५९ टक्क्यांनी वाढून ७,७५८.८0 अंकांवर बंद झाला.
वाहन क्षेत्रात तेजीचे वातावरण राहिले. एमअँडएम, टाटा मोटर्स, बजाज आॅटो आणि हीरो मोटोकॉर्पस् यांचे समभाग ४.२९ अंकांपर्यंत वाढले. आयटी क्षेत्रातील जिओमेट्रिक आणि एचसीएलचे समभाग वाढले. (वृत्तसंस्था)

Web Title: Sensex recovered by 130 points on the eve of crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.