Lokmat Money > बिझनेस न्यूज > सेन्सेक्स पोहोचला महिन्याच्या उच्चांकावर

सेन्सेक्स पोहोचला महिन्याच्या उच्चांकावर

अपेक्षेपेक्षा चांगले राहिलेले कंपन्यांचे तिमाही निकाल आणि आशियाई बाजारातील मजबुती या बळावर भारतीय शेअर बाजारांत शुक्रवारी तेजी परतली.

By admin | Updated: May 23, 2015 00:01 IST2015-05-23T00:01:22+5:302015-05-23T00:01:22+5:30

अपेक्षेपेक्षा चांगले राहिलेले कंपन्यांचे तिमाही निकाल आणि आशियाई बाजारातील मजबुती या बळावर भारतीय शेअर बाजारांत शुक्रवारी तेजी परतली.

The Sensex reached the highest level of the month | सेन्सेक्स पोहोचला महिन्याच्या उच्चांकावर

सेन्सेक्स पोहोचला महिन्याच्या उच्चांकावर

मुंबई : अपेक्षेपेक्षा चांगले राहिलेले कंपन्यांचे तिमाही निकाल आणि आशियाई बाजारातील मजबुती या बळावर भारतीय शेअर बाजारांत शुक्रवारी तेजी परतली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १४८ अंकांनी वाढून २७,९५७.५0 अंकांवर बंद झाला. विशेष म्हणजे सेन्सेक्स काही काळ २८ हजार अंकांच्या वर होता.
५0 कंपन्यांचा समावेश असलेला व्यापक आधारावरील राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ८,५00 अंकांच्या उंबरठ्यावर आला आहे. निफ्टी ३७.९५ अंकांच्या वाढीसह ८,४५८.९५ अंकांवर बंद झाला.
३0 कंपन्यांचा समावेश असलेला सेन्सेक्स दिवसभर खाली-वर होताना दिसून आला. एका क्षणी तो २८,0७१ अंकांपर्यंत पोहोचला होता. सत्रअखेरीस २७,९५७.५0 अंकांवर बंद होता. सेन्सेक्सने १४८.१५ अंकांची अथवा 0.५३ टक्क्यांची वाढ नोंदविली. ही पातळी सेन्सेक्सने १७ एप्रिलपासून गाठली नव्हती.
एचडीएफसीला सर्वाधिक लाभ मिळाला. कंपनीचा समभाग २.५१ टक्क्यांनी वाढला. त्यापाठोपाठ २.४२ टक्क्यांच्या वाढीसह टीसीएसचा समभाग दुसऱ्या क्रमांकावर राहिला. एसबीआयच्या २३ टक्क्यांची वाढ झाली असली तरी नफा वसुलीमुळे बँकेचा समभाग घसरला. या आठवड्यात सेन्सेक्स ६३३.८0 अंकांनी अथवा २.३२ टक्क्यांनी वाढला आहे. त्याबरोबर सेन्सेक्स साप्ताहिक वाढीचा तिसरा आठवडा पूर्ण केला आहे.
आशियाई बाजारांत मजुबतीचा कल दिसून आला. चीन, हाँगकाँग, जपान, सिंगापूर, दक्षिण कोरिया आणि तैवान येथील बाजार 0.३0 टक्के ते २.८३ टक्के वाढले.
सेन्सेक्समधील ३0 कंपन्यांपैकी १७ कंपन्यांना तेजीचा लाभ मिळाला. १२ कंपन्यांचे समभाग घसरले. आयसीआयसीआय बँकेचे समभाग स्थिर राहिले. (वृत्तसंस्था)

४तेजीचा लाभ मिळालेल्या कंपन्यांत सन फार्मा, ओएनजीसी, लार्सन, भेल, टाटा मोटर्स आणि आरआयएल यांचा समावेश आहे. एसबीआयएन, हिंदाल्को, व्हीईडीएल, विप्रो आणि टाटा पॉवर यांचे समभाग घसरले.
४बाजाराची एकूण व्याप्ती नकारात्मक राहिली. १,५१८ कंपन्यांचे समभाग घसरले. १,१९७ कंपन्यांचे समभाग वाढले. ११९ कंपन्यांचे समभाग स्थिर राहिले. बाजाराची एकूण उलाढाल घटून ३,0२३.९३ कोटी रुपये झाली. काल ती ३,७२४.६६ कोटी रुपये होती.

Web Title: The Sensex reached the highest level of the month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.