मुंबई : भारतातील शेअर बाजारांनी आज पुन्हा एकदा विक्रमी ङोप घेतली. 165 अंकांनी वाढलेला मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 28,500 अंकांवर पोहोचला. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या सीएनएक्स निफ्टीने 53 अंकांची वाढ नोंदवून 8,500 अंकांचा टप्पा गाठला.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात केंद्र सरकार आर्थिक सुधारणांना गती देणारे निर्णय घेऊ शकते, अशी आशा निर्माण झाल्यामुळे बाजारात उत्साहाचे वातावरण आहे. त्यातच चीन आणि युरोपीय देशांकडून आणखी प्रोत्साहन योजना जाहीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अर्थव्यवस्थेला गती मिळावी यासाठी चीनने अचानक व्याजदर कपातीची घोषणा केली आहे. चीनमध्ये 2 वर्षात प्रथमच व्याजदर कपात होत आहे. या पाश्र्वभूमीवर बाजार तेजीत आले आहेत.
इन्फोसिस, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक आणि टीसीएस या कंपन्यांच्या समभागांनी उत्तम कामगिरी केली. त्याबळावर सेन्सेक्सने 28,541.96 अंकांचा, तर निफ्टीने 8,534.65 अंकांचा इंट्रा-डे विक्रम नोंदविला. दोन्ही निर्देशांकांनी सलग तिस:या दिवशी वाढीची नोंद केली आहे.
ब्रोकरांनी सांगितले की, नोव्हेंबरमधील करारांची अंतिम मुदत गुरुवारी संपत आहे. त्यामुळे बाजारातील हालचालींना वेग आला आहे. आयटी, धातू, बँकिंग आणि टेक या क्षेत्रतील समभागांनी गुंतवणूकदारांना आकर्षित केले. या उलट रिफायनरी आणि फार्मा क्षेत्रतील समभागांत विक्रीचा जोर दिसून आला.
30 कंपन्यांचा समावेश असलेल्या सेन्सेक्सने सकाळी तेजीने सुरुवात झाली. एका क्षणी सेन्सेक्स 28,541.96 अंकांवर पोहोचला होता. दिवस अखेरीस तो 28,499.54 अंकांवर बंद झाला. 164.91 अंक अथवा 0.58 टक्क्यांची वाढ सेन्सेक्सने नोंदविली. सलग तीन सत्रंतील तेजीने सेन्सेक्सला 466.69 अंकांची वाढ मिळाली आहे. ती 1.66 टक्के आहे.
50 कंपन्यांचा समावेश असलेल्या व्यापक आधारावरील सीएनएक्स निफ्टी 52.80 अंक अथवा 0.62 टक्के वाढ नोंदवून 8,530.15 अंकांवर बंद झाला. एका क्षणी तो 8,534.65 अंकांवर पोहोचला होता. दिवसअखेरीस थोडा खाली येऊन तो बंद झाला.
इन्फोसिसने 3 डिसेंबर ही बोनस समभागासाठीची तारीख जाहीर केली आहे. कंपनी भागधारकांना एका शेअरवर एक शेअर बोनस देणार आहे. या घोषणोने आयटी क्षेत्रत खरेदीचा जोर वाढला आणि बाजारात उत्साह संचारला. चीनमधील दर कपातीमुळे धातू क्षेत्रतील कंपन्यांच्या समभागांची मागणी वाढली.
सिंगापूर वगळता इतर सर्व आशियाई बाजार वाढीसह बंद झाले. 0.34 टक्के ते 1.95 टक्के वाढ या बाजारांनी नोंदविली. युरोपीय बाजारात सकाळच्या सत्रत तेजीचे वातावरण होते.
(प्रतिनिधी)
च्बीएसईने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, फॉरेन पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी शुक्रवारी 122.50 कोटी रुपयांची खरेदी केली.
च्दुस:या दर्जाच्या कंपन्यांच्या समभागांना फटका बसल्यामुळे बाजाराचा एकूण विस्तार नकारात्मक राहिला. 1,732 कंपन्यांचे समभाग तोटय़ात राहिले. 1,332 कंपन्यांचे समभाग नफ्यात राहिले. 125 कंपन्यांचे समभाग स्थिर होते.
सेन्सेक्समधील 30 कंपन्यांपैकी 17 कंपन्यांचे समभाग वाढले. 13 कंपन्यांचे समभाग कोसळले. तेजीचा लाभ मिळालेल्या बडय़ा कंपन्यांत टाटा पॉवर, हिंदाल्को, इन्फोसिस, टाटा स्टील, आयसीआयसीआय बँक, भेल, हीरो मोटोकॉर्प, टीसीएस यांचा समावेश आहे. एचडीएफसी बँक, विप्रो, एसबीआय यांनाही तेजीचा लाभ मिळाला. सिप्ला आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्स मात्र कोसळले.