Lokmat Money > बिझनेस न्यूज > सेन्सेक्स, निफ्टी वाढले

सेन्सेक्स, निफ्टी वाढले

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारचे पहिले संपूर्ण बजेट शनिवारी सादर होत असताना आज शुक्रवारी संसदेत मांडण्यात आलेल्या सर्वेक्षणामुळे शेअर

By admin | Updated: February 28, 2015 00:06 IST2015-02-28T00:06:46+5:302015-02-28T00:06:46+5:30

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारचे पहिले संपूर्ण बजेट शनिवारी सादर होत असताना आज शुक्रवारी संसदेत मांडण्यात आलेल्या सर्वेक्षणामुळे शेअर

Sensex, Nifty raised | सेन्सेक्स, निफ्टी वाढले

सेन्सेक्स, निफ्टी वाढले

मुंबई : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारचे पहिले संपूर्ण बजेट शनिवारी सादर होत असताना आज शुक्रवारी संसदेत मांडण्यात आलेल्या सर्वेक्षणामुळे शेअर बाजारात तेजी उसळली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ४७३.४७ अंकांनी वाढून २९,२२0.१२ अंकांवर बंद झाला. ८,८00 अंकांचा टप्पा ओलांडून वर चढलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने १६0.७५ अंकांची वाढ नोंदविली.
बीएसई सेन्सेक्स सकाळी २८,८६५.१२ अंकांवर तेजीसह उघडला. आर्थिक सर्वेक्षण संसदेत सादर होताच सेन्सेक्सने उसळी घेतली. २९ हजार अंकांचा टप्पा ओलांडून तो वर चढला. एका क्षणी तो २९,२५४.0२ अंकांवर पोहोचला होता. दिवस अखेरीस तो २९,२२0.१२ अंकांवर बंद झाला. ४७३.४७ अंकांची वाढ त्याने नोंदविली. ही वाढ १.६५ टक्के आहे. २0 जानेवारी २0१५ नंतरचा हा सर्वांत मोठा लाभ ठरला आहे. २0 जानेवारी रोजी सेन्सेक्स ५२२ अंकांनी वाढला होता. ५0 कंपन्यांच्या समभागांवर आधारित राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ८,८00 अंकांचा टप्पा ओलांडून वर चढला. १६0.७५ अंकांची अथवा १.८५ टक्क्यांची वाढ त्याने नोंदविली. निफ्टी ८,८४४.६0 अंकांवर बंद झाला. त्याआधी तो ८,७१७.४५ ते ८,८५६.९५ अंकांच्या मध्ये वर-खाली होत होता.
 

Web Title: Sensex, Nifty raised

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.