Lokmat Money > बिझनेस न्यूज > सेन्सेक्स, निफ्टी नव्या उच्चांकावर

सेन्सेक्स, निफ्टी नव्या उच्चांकावर

शेअर बाजारांनी सलग चौथ्या व्यावसायिक सत्रात तेजी कायम ठेवताना नवा सार्वकालिक उच्चांक प्रस्थापित केला

By admin | Updated: January 21, 2015 00:00 IST2015-01-21T00:00:52+5:302015-01-21T00:00:52+5:30

शेअर बाजारांनी सलग चौथ्या व्यावसायिक सत्रात तेजी कायम ठेवताना नवा सार्वकालिक उच्चांक प्रस्थापित केला

Sensex, Nifty on new apex | सेन्सेक्स, निफ्टी नव्या उच्चांकावर

सेन्सेक्स, निफ्टी नव्या उच्चांकावर

मुंबई : शेअर बाजारांनी सलग चौथ्या व्यावसायिक सत्रात तेजी कायम ठेवताना नवा सार्वकालिक उच्चांक प्रस्थापित केला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ५२२.६६ अंकांनी वाढून २८,७८४.६७ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा सीएनएक्स निफ्टी ८,७00 अंकांवर बंद झाला. दोन्ही बाजारांनी बंदचा सार्वकालिक उच्चांक केला आहे.
बँकिंग क्षेत्रात आज जोरदार खरेदी झाली. त्याचप्रमाणे धातू आणि तेल व गॅस क्षेत्रातही सुधारणा दिसून आली. विदेशी गुंतवणूकदारांनीही आज जोरदार खरेदी केली. त्याचा परिणाम बाजारात दिसून आला. शेअर बाजारांचे निर्देशांक सार्वकालिक उंचीवर पोहोचले.
सेन्सेक्समधील कंपन्यांत एचडीएफसीने सर्वाधिक ५.८४ टक्के वाढ नोंदविली. त्यापाठोपाठ एसएसएलटी, टाटा स्टील, अ‍ॅक्सिस बँक आणि टाटा मोटर्स यांना लाभ मिळाला. ३0 कंपन्यांचा समावेश असलेला सेन्सेक्स सकाळी तेजीनेच उघडला. ही तेजी दिवसभर कायम होती. सत्र अखेरीस २८,७८४.६७ अंकांवर तो बंद झाला. ५२२.६६ अंकांची अथवा १.८५ टक्क्यांची वाढ त्याने नोंदविली. ५0 कंपन्यांचा समावेश असलेल्या व्यापक आधारावरील निफ्टी १४४.९0 अंकांनी वर चढला. ही वाढ १.६९ टक्के आहे. दिवसअखेरीस तो ८,६९५.६0 अंकांवर बंद झाला. ही निफ्टीची सर्वोच्च बंद पातळी आहे. बंदपूर्वी निफ्टी ८,७00 अंकांची पातळीही ओलांडून खाली आला. इतिहासात प्रथमच त्याने ८,७00 अंकांची पातळी ओलांडली. तत्पूर्वी काल शेअर बाजारात विदेशी गुंतवणूकदारांनी ४३३.७२ कोटींची शेअर खरेदी केली.






ल्याचे बाजारातील आकड्यांवरून स्पष्ट झाले.
सेन्सेक्समध्ये समावेश असलेल्या ३0 कंपन्यांपैकी २२ कंपन्यांचे समभाग वाढले. आठ कंपन्यांचे समभाग घसरले. लाभ मिळविणाऱ्या कंपन्यांत आयटीसी, हिंदाल्को, रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, एसबीआय, भारती एअरटेल, विप्रो यांचा सामवेश आहे. गेल इंडियाचे समभाग मात्र घसरले. (वृत्तसंस्था)

४बाजाराची एकूण व्याप्ती सकारात्मक राहिली. १,५६0 कंपन्यांचे समभाग वाढले. १,४१२ कंपन्यांचे समभाग घसरले. ११७ कंपन्यांचे समभाग स्थिर राहिले. बाजाराची एकूण उलाढाल ३,२९१.८७ कोटींवर आली. काल ती ३,४८७.७२ कोटी होती.

४आशियाई बाजारातही तेजीचे वातवरण दिसून आले. चीन, हाँगकाँग, जपान, सिंगापूर, दक्षिण कोरिया आणि तैवान येथील बाजार 0.८0 टक्के ते २.0७ टक्के तेजीत होते.

४युरोपीय मार्केटांत सकाळच्या सत्रात तेजीचे वातावरण दिसून आले. फ्रान्स, जर्मनी आणि ब्रिटन येथील बाजार 0.१५ टक्के ते 0.३४ टक्के तेजीत होते.

Web Title: Sensex, Nifty on new apex

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.