मुंबई : भारतीय शेअर बाजारात तेजीचा सिलसिला कायम आहे. भांडवल प्रवाह कायम राहिल्याने मुंबई शेअर बाजारात सेन्सेक्स आज ७८ अंकांनी उंचावून २६,६३८.११ अंकांच्या नव्या उंचीवर पोहोचला. सेन्सेक्सचा तेजीचा सिलसिला सातव्या दिवशीही जारी राहिला. उल्लेखनीय म्हणजे सलग सातव्या महिन्यात सेन्सेक्समध्ये तेजी नोंदली गेली.
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही १८ अंकांची झेप घेत ७,९५४.३५ अंकाच्या नव्या विक्रमावर पोहोचला. युक्रेनमधील तणावामुळे कमजोर जागतिक संकेतादरम्यान, मासिक डेरिव्हेटीव्हज करारांच्या निपटाऱ्याने बाजारात चढ-उतार राहिला.
ब्रोकर्सनी सांगितले की, अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी केंद्र सरकारच्या उपापयोजनांमुळे गुंतवणूकदारांत उत्साह आहे. भांडवली वस्तू, तेल शुद्धीकरण आणि एफएमसीजी कंपन्यांच्या शेअर्सला मोठी मागणी राहिली. दुसरीकडे, बांधकाम, धातू आणि माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या शेअर्समध्ये घट झाल्याचे दिसून आले.
मुंबई शेअर बाजारात ३० शेअर्सवाला सेन्सेक्स प्रारंभी झेप घेत दिवसअखेरीस ७७.९६ अंक वा ०.२९ अंकाच्या तेजीसह नवी विक्रमी पातळी २६,६३८.११ अंकावर स्थिरावला. दिवसभरात सेन्सेक्सने आपली सार्वकालिक उच्चांकी पातळी २६,६७४.३८ अंकावरही गेला होता. तसेच सेन्सेक्सने २६,५६०.१५ अंक ही कालची विक्रमी पातळीही गाठली. गेल्या सहा सत्रांत सेन्सेक्स ३२४ अंकांनी उंचावला.
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १८.३० अंक वा ०.२३ टक्क्यांच्या तेजीसह ७,९५४.३५ अंक या विक्रमी पातळीवर बंद झाला. राष्ट्रीय निर्देशांकाने कालची ७,९३६.०५ अंक ही विक्रमी पातळीही ओलांडली. दिवसभराच्या व्यवहारात निफ्टीने ७,९६७.८० अंक ही विक्रमी पातळीही गाठली. (प्रतिनिधी)
सेन्सेक्स, निफ्टीची उच्चांकी भरारी
भारतीय शेअर बाजारात तेजीचा सिलसिला कायम आहे. भांडवल प्रवाह कायम राहिल्याने मुंबई शेअर बाजारात सेन्सेक्स आज ७८ अंकांनी उंचावून २६,६३८.११ अंकांच्या नव्या उंचीवर पोहोचला.
By admin | Updated: August 29, 2014 01:59 IST2014-08-29T01:59:04+5:302014-08-29T01:59:04+5:30
भारतीय शेअर बाजारात तेजीचा सिलसिला कायम आहे. भांडवल प्रवाह कायम राहिल्याने मुंबई शेअर बाजारात सेन्सेक्स आज ७८ अंकांनी उंचावून २६,६३८.११ अंकांच्या नव्या उंचीवर पोहोचला.
