Lokmat Money > बिझनेस न्यूज > सेन्सेक्स-निफ्टीची उड्डाणावर उड्डाणो

सेन्सेक्स-निफ्टीची उड्डाणावर उड्डाणो

भारतीय शेअर बाजारातील सेन्सेक्स आणि निफ्टीने आपली तेजी कायम ठेवली आहे.

By admin | Updated: June 6, 2014 21:42 IST2014-06-06T21:42:24+5:302014-06-06T21:42:24+5:30

भारतीय शेअर बाजारातील सेन्सेक्स आणि निफ्टीने आपली तेजी कायम ठेवली आहे.

Sensex-Nifty Flights | सेन्सेक्स-निफ्टीची उड्डाणावर उड्डाणो

सेन्सेक्स-निफ्टीची उड्डाणावर उड्डाणो

>मुंबई : भारतीय शेअर बाजारातील सेन्सेक्स आणि निफ्टीने आपली तेजी कायम ठेवली आहे. मान्सूनचे आगमन आणि नैसर्गिक गॅसच्या किमती वाढल्याच्या पाश्र्वभूमीवर बाजाराने गुंतवणूकदारांना आकर्षित केले. त्यामुळे दोन्ही बाजार ऐतिहासिक उच्चांकावर ङोप घेत बंद झाले. 
मागील सत्रत पहिल्यांदाच 25 हजारापार बंद झालेला सेन्सेक्स आज 25,419 वर पोहोचला होता; परंतु बाजारात झालेल्या नफेखोरीमुळे सेन्सेक्स 376.95 अंकांनी वधारून 25,396.46 या ‘ऑल टाईम हाय’वर बंद झाला.
यापूर्वी 16 मे रोजी सेन्सेक्स 25,375 या उच्चांकी पातळीवर पोहोचला होता, तसेच 5 जून रोजी बाजार प्रथमच 25,क्19 या ऐतिहासिक उच्चांकावर बंद झाला होता. आठवडय़ाच्या आधारे मुंबई शेअर बाजार 1,179 अंकांनी किंवा 4.89 टक्क्यांनी खाली आला होता.
त्याचप्रमाणो नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा निफ्टीसुद्धा 1क्9.3क् अंकांनी वधारून पहिल्यांदाच 7,583.4क् या उच्चांकी पातळीवर बंद झाला. मागील सत्रत बाजार 7,563 र्पयत पोहोचला होता.
 युरोपियन सेंट्रल बँकेकडून प्रोत्साहन निधीची घोषणा झाल्यामुळे भारतीय शेअर बाजारांना गती प्राप्त झाली आहे. त्याप्रमाणो गुंतवणूकदारांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले.
 नैसर्गिक गॅसच्या दराचा तिढा सुटण्याच्या संकेतामुळे रिलायन्सच्या शेअर्सचे भाव वधारले, असे कोटक सिक्युरिटीजचे संशोधन प्रमुख दीपेन शहा म्हणाले.
गुरुवारच्या व्यावसायिक सत्रमध्ये परकीय संस्थागत गुंतवणूकदारांनी 1,368.97 कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले. शुक्रवारी बारापैकी नऊ क्षेत्रतील शेअर्स झळाळले. रियल्टी, ऑईल अँड गॅस आणि बँकिंग क्षेत्रतील शेअर्समध्ये अधिक तेजी बघायला मिळाली.
आशियाई शेअर बाजारात संमिश्र कल दिसून आला. जपान आणि सिंगापूरचे बाजार वाढीसह, तर चीन, हाँगकाँग, दक्षिण कोरिया आणि तैवानचे बाजार घसरणीसह बंद झाले. युरोपियन शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात झाली.
 बीएसईमधील 3क् पैकी 24 कंपन्यांचे शेअर्स वाढीसह बंद झाले. (प्रतिनिधी)
 
-आजच्या सुपरफास्ट तेजीमुळे मुंबई शेअरबाजाराने 52 आठवडय़ांचा विक्रम केला आहे. हा उच्चंक सर्वच दृष्टींनी ऐतिहासिक ठरला आहे. 
 
-जागतिक अर्थव्यवस्थेत तेजीचे संकेत मिळत आहेत. चीनच्या पोलाद आणि उत्पादन क्षेत्रत मोठी वाढ झाली आहे. चीनची अर्थव्यवस्था जगातील दुस:या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था आहे. तेथील तेजीचा जगभरातील बाजारांवर परिणाम झाला आहे. 

Web Title: Sensex-Nifty Flights

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.