Lokmat Money > बिझनेस न्यूज > कमजोर तिमाही निकालांमुळे सेन्सेक्स, निफ्टीमध्ये घसरण

कमजोर तिमाही निकालांमुळे सेन्सेक्स, निफ्टीमध्ये घसरण

तिमाही निकालांत कंपन्यांची कमजोर कामगिरी, विदेशी गुंतवणूकदारांचा आखडता हात आणि ग्रीसविषयीच्या चिंता यामुळे गुरुवारी शेअर बाजार कोसळले.

By admin | Updated: May 28, 2015 23:41 IST2015-05-28T23:41:43+5:302015-05-28T23:41:43+5:30

तिमाही निकालांत कंपन्यांची कमजोर कामगिरी, विदेशी गुंतवणूकदारांचा आखडता हात आणि ग्रीसविषयीच्या चिंता यामुळे गुरुवारी शेअर बाजार कोसळले.

Sensex, Nifty fall due to weak quarterly earnings | कमजोर तिमाही निकालांमुळे सेन्सेक्स, निफ्टीमध्ये घसरण

कमजोर तिमाही निकालांमुळे सेन्सेक्स, निफ्टीमध्ये घसरण

मुंबई : तिमाही निकालांत कंपन्यांची कमजोर कामगिरी, विदेशी गुंतवणूकदारांचा आखडता हात आणि ग्रीसविषयीच्या चिंता यामुळे गुरुवारी शेअर बाजार कोसळले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ५८ अंकांनी घसरून २७,५0६.७१ अंकांवर बंद झाला.
३0 कंपन्यांचा समावेश असलेला सेन्सेक्स सकाळी तेजीसह उघडला होता. त्यानंतर तो आणखी वर चढून २७,६६६.३७ अंकांवर गेला. त्यानंतर मात्र त्यात घसरण सुरू झाली. सत्र अखेरीस ५७.९५ अंकांची अथवा 0.२१ टक्क्यांची घसरण नोंदवून सेन्सेक्स २७,५0६.७१ अंकांवर बंद झाला. काल सेन्सेक्सने ३३.२५ अंकांची वाढ मिळविली होती.
५0 कंपन्यांचा समावेश असलेला व्यापक आधारावरील राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १५.६0 अंकांनी घसरून ८,३१९ अंकांवर बंद झाला. तत्पूर्वी काल विदेशी गुंतवणूकदारांनी ९३४.९८ कोटी रुपयांचे समभाग विकले.
सेन्सेक्समध्ये समावेश असलेल्या ३0 कंपन्यांपैकी १८ कंपन्यांचे समभाग घसरले.
सिप्लाला सर्वाधिक २.५८ टक्क्यांची घसरण सोसावी लागली. टाटा पॉवर, सन फार्मा, एमअँडएम, भारती एअरटेल, डॉ. रेड्डीज, हिंदाल्को, आरआरएल, एसबीआय आणि टाटा स्टील यांचे समभागही घसरले. वेदांता, टाटा मोटर्स, इन्फोसिस, हीरो मोटोकॉर्प आणि भेल यांचे समभाग वर चढले.
बाजाराची एकूण व्याप्ती नकारात्मक राहिली. १,४0६ कंपन्यांचे समभाग घसरले. १,२५५ कंपन्यांचे समभाग वाढले. ११५ कंपन्यांचे समभाग स्थिर राहिले. बाजाराची एकूण उलाढाल घटून २,५८३.८९ कोटी रुपये झाली. आदल्या सत्रात ती २,७६९.६६ कोटी रुपये होती. (वृत्तसंस्था)

४आशियाई बाजारांत संमिश्र कल दिसून आला. हाँगकाँग येथील बाजार २.२३ टक्क्यांनी, तर सिंगापूरचा बाजार 0.२१ टक्क्यांनी घसरला. जपान, दक्षिण कोरिया आणि तैवान येथील बाजार मात्र 0.२0 टक्के ते 0.३९ टक्के वाढले.

४युरोपीय बाजारात सकाळच्या सत्रात घसरणीचाच कल दिसून आला. ग्रीस आणि त्याचे कर्जदार यांच्यात कुठलाही समझोता होऊ शकलेला नाही. त्याचा परिणाम युरोपीय बाजारांवर दिसून आला.

Web Title: Sensex, Nifty fall due to weak quarterly earnings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.