Lokmat Money > बिझनेस न्यूज > सेन्सेक्स, निफ्टी अत्यल्प घटले

सेन्सेक्स, निफ्टी अत्यल्प घटले

व्यवहारांतील सुस्तीमुळे बुधवारी शेअर बाजार संमिश्र राहिले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १.३0 अंकांनी घटून २८,४४२.७१ अंकांवर बंद झाला

By admin | Updated: December 4, 2014 00:37 IST2014-12-04T00:37:25+5:302014-12-04T00:37:25+5:30

व्यवहारांतील सुस्तीमुळे बुधवारी शेअर बाजार संमिश्र राहिले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १.३0 अंकांनी घटून २८,४४२.७१ अंकांवर बंद झाला

Sensex, Nifty drift lower | सेन्सेक्स, निफ्टी अत्यल्प घटले

सेन्सेक्स, निफ्टी अत्यल्प घटले

मुंबई : व्यवहारांतील सुस्तीमुळे बुधवारी शेअर बाजार संमिश्र राहिले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १.३0 अंकांनी घटून २८,४४२.७१ अंकांवर बंद झाला. स्मॉलकॅप आणि मिडकॅप कंपन्यांच्या समभागांनी मात्र उत्तम परतावा दिला. जागतिक बाजारातही असाच कल दिसून आला. विक्री आणि खरेदी असा दोघांचाही जोर असल्यामुळे बाजार जवळपास स्थिर राहिले.
वान, रिअल्टी, वीज, रिफायनरी आणि भांडवली वस्तू या क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांत तेजी दिसून आली. आयटी आणि दूरसंचार कंपन्यांच्या समभागांत घसरण दिसून आली. मॅडकॅपचा निर्देशांक १.३९ टक्के तर स्मॉलकॅपचा निर्देशांक १.६४ टक्क्यांनी वाढला.
३0 कंपन्यांच्या समभागांचा समावेश असलेला मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सकाळी २८,४७२.३२ अंकांवर मजबुतीने उघला होता. त्यानंतर २८,५0४.६५ अंकांपर्यंत वर चढला होता. नंतर मात्र नफावसुलीचे सत्र सुरू झाले आणि बाजार घसरणीला लागला. एका क्षणी तो २८,३७0.७३ अंकांपर्यंत घसरला होता. सत्रअखेरीस १.३0 अंकांची नाममात्र घट नोंदवून सेन्सेक्स २८,४४२.७१ अंकांवर बंद झाला. गेल्या तीन दिवसांत सेन्सेक्सने २५0 अंक गमावले आहे.
नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी १२.९५ अंक म्हणजेच 0.१५ टक्क्यांनी घसरून ८,५३७.६५ अंकांवर बंद झाला. व्यवसायादरम्यान तो ८,५0८.३५ अंक ते ८,५४६.९५ अंकांच्या दरम्यान खालीवर होताना दिसून आला.
रिझर्व्ह बँकेने काल वित्तीय धोरणाचा आढावा घेताना धोरणात्मक व्याजदरात कोणताही बदल केला नव्हता. त्यामुळे सावध पवित्र्यात आलेल्या गुंतवणूकदारांनी आज नफा वसुलीला महत्त्व दिले. ब्रोकरांनी सांगितले की, येणाऱ्या काही दिवसांत निफ्टी आणखी मजबूत होईल. तो ८,३५0 अंकांपर्यंत जाण्याची आम्हाला आशा वाटते.
आशियाई बाजारांत संमिश्र कल पाहायला मिळाला. हाँगकाँग, सिंगापूर येथील बाजार 0.५७ टक्का ते 0.९५ टक्का यादरम्यान घसरले. चीन, जपान, दक्षिण कोरिया आणि तैवान येथील बाजार मात्र 0.२१ टक्का ते १.५५ टक्का वाढले. सकाळच्या सत्रात युरोपीय बाजारातही असाच संमिश्र कल पाहायला मिळाला.
बाजाराचा एकूण व्याप सकारात्मक राहिला. १,९२९ कंपन्यांचे समभाग तेजीत राहिले. १,0८२ कंपन्यांचे समभाग कोसळले. १२0 कंपन्यांचे समभाग आदल्या दिवशीच्या पातळीवर स्थिर राहिले. बाजाराची एकूण उलाढाल ३,९३४.९१ कोटी झाली. आदल्या सत्रात ती ३,३३४.७२ कोटी रुपये होती.(प्रतिनिधी)

Web Title: Sensex, Nifty drift lower

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.