Lokmat Money > बिझनेस न्यूज > सेन्सेक्स, निफ्टी यांची घोडदौड!

सेन्सेक्स, निफ्टी यांची घोडदौड!

मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी यांनी मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी तेजी दर्शविली. यंदा चांगला पावसाळा असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त

By admin | Updated: April 13, 2016 02:45 IST2016-04-13T02:45:55+5:302016-04-13T02:45:55+5:30

मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी यांनी मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी तेजी दर्शविली. यंदा चांगला पावसाळा असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त

Sensex, Nifty crusade! | सेन्सेक्स, निफ्टी यांची घोडदौड!

सेन्सेक्स, निफ्टी यांची घोडदौड!


मुंबई : मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी यांनी मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी तेजी दर्शविली. यंदा चांगला पावसाळा असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केल्याचा लाभ निर्देशांकांना झाला.
३0 कंपन्यांचा समावेश असलेला सेन्सेक्स १२३.४३ अंकांनी अथवा 0.४९ टक्क्यांनी वाढून २५,१४५.५९ अंकांवर बंद झाला. ४ एप्रिलनंतरचा हा सर्वोच्च बंद ठरला. आदल्या सत्रात सेन्सेक्स ३४८.३२ अंकांनी वाढला होता. ५0 कंपन्यांचा समावेश असलेला व्यापक आधारावरील निफ्टी ३७.५५ अंकांनी अथवा 0.४९ टक्क्यांनी वाढून ७,७0८.९५ अंकांवर बंद झाला.
सराफा दुकाने सुरू झाल्यामुळे ज्वेलरी क्षेत्रातील कंपन्यांचे समभाग वाढले. त्रिभुवनदास भीमजी जव्हेरीचा समभाग ४.६0 टक्के आणि पीसी ज्वेलर्सचा समभाग ३.५७ टक्के वाढला. अन्य आशियाई बाजारांपैकी जपानचा निक्केई १.१३ टक्क्यांनी वाढला. हाँगकाँग, सिंगापूर, दक्षिण कोरिया येथील बाजारही 0.१९ टक्के ते 0.५६ टक्क्यांपर्यंत वर चढले. चीन आणि तैवानचे बाजार मात्र 0.३७ टक्क्यांपर्यंत घसरले. युरोपीय बाजारात संमिश्र कल राहिला. फ्रान्स आणि ब्रिटन येथील बाजार 0.१0 टक्क्यांपर्यंत घसरण दर्शवीत होते.
 

 

Web Title: Sensex, Nifty crusade!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.