Lokmat Money > बिझनेस न्यूज > सेन्सेक्सचा नऊ सप्ताहातील नीचांक

सेन्सेक्सचा नऊ सप्ताहातील नीचांक

मुंबई शेअरबाजारात सोमवारी सलग चौथ्या दिवशी घसरण आली. युरोपीय बाजार कमजोर असल्याने त्याचा परिणाम मुंबई बाजारावर झाला व निर्देशांक ६९ .०६ अंकाने खाली आला.

By admin | Updated: March 23, 2015 23:45 IST2015-03-23T23:45:37+5:302015-03-23T23:45:37+5:30

मुंबई शेअरबाजारात सोमवारी सलग चौथ्या दिवशी घसरण आली. युरोपीय बाजार कमजोर असल्याने त्याचा परिणाम मुंबई बाजारावर झाला व निर्देशांक ६९ .०६ अंकाने खाली आला.

Sensex low of nine weeks | सेन्सेक्सचा नऊ सप्ताहातील नीचांक

सेन्सेक्सचा नऊ सप्ताहातील नीचांक

मुंबई : मुंबई शेअरबाजारात सोमवारी सलग चौथ्या दिवशी घसरण आली. युरोपीय बाजार कमजोर असल्याने त्याचा परिणाम मुंबई बाजारावर झाला व निर्देशांक ६९ .०६ अंकाने खाली आला. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा निफ्टी निर्देशांकही २० अंकाने घसरुन ८,५५०.९० वर आला.
आयटी , दूरसंचार , टिकाऊ उपभोक्ता सामान , व बँकींग शेअरमध्ये विक्रीचा प्रभाव वाढला. स्मॉल कॅप व मिड कॅप शेअरही घसरले. मुंबई शेअर बाजारातील ९२० शेअर फायद्यात व १,९०० शेअर नुकसानीत बंद झाले.
सुरुवातीच्या व्यवहारात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक २८,३८५.१४ अंकावर खुला झाला , नफेखोरी झाल्यामुळे २८,१६३.९० अंकावर खाली आला. अखेरपर्यंत नफेखोरीचाच प्रभाव राहीला व ६९,०६ अंक वा ०.२४ टक्के घसरण होत निर्देशांक २८,१९२.०२ अंकावर बंद झाला. १६
जानेवारीनंतर ही सर्वाधिक घसरण आहे, त्यादिवशी २८,१२१.८९ अंकावर निर्देशांक बंद झाला होता.
सरकारने जिंदाल स्टील अँड पॉवर , जेएसपील कंपनीची कोळसा लिलवातील बोली रद्द केल्यानंतर कंपनीचा शेअर आज ६ टक्क्यापेक्षा अधिक कोसळला. दिवसभरात एकदा तर तो १५ टक्के खाली आला होता. पण हिंडाल्को व एनटीपीसीचे शेअर मात्र फायद्यात राहिले. रुपया मजबूत झाल्याने आय टी कंपन्याना नुकसान झाले असेही सूत्रांनी सांगितले.

Web Title: Sensex low of nine weeks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.