मुंबई : युरोपीय बँकेने जाहीर केलेले प्रोत्साहन उपाययोजना असमाधानकारक सिद्ध झाल्यामुळे जगभरातील शेअर बाजारांत शुक्रवारी घसरण पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २४८ अंकांनी घसरून २५,६३८.११ अंकांवर बंद झाला.
डॉलरच्या तुलनेत रुपयातील घसरणही भारतीय बाजारांच्या घसरणीला कारणीभूत ठरला. १ डॉलरची किंमत ६७.0१ रुपये झाली असून, हा रुपयाचा २ वर्षांचा नीचांक ठरला आहे.
मुंबई शेअर बाजारात सकाळी नरमाईनेच प्रारंभ झाला. ३0 कंपन्यांचा समावेश असलेला सेन्सेक्स २५,६२३.७१ अंकांपर्यंत घसरला. नंतर त्यात थोडी सुधारणा झाल्याने २४८.११ अंकांच्या घसरणीसह २५,६३८.५१ अंकांवर बंद झाला. ही घसरण 0.९६ टक्के आहे. सेन्सेक्सचा हा दोन आठवड्यांचा नीचांक ठरला आहे. १८ नोव्हेंबर रोजी सेन्सेक्स या पातळीवर होता. गेल्या तीन दिवसांत सेन्सेक्स ५३१.३0 अंकांनी घसरला आहे.
व्यापक आधारावरील राष्ट्रीय शेअर बाजाराचा एनएसई निफ्टी ७,८00 अंकांच्या खाली घसरला आहे. ८२.२५ अंकांची अथवा १.0५ टक्क्यांची घसरण नोंदवून निफ्टी ७,७८१.९0 अंकांवर बंद झाला. त्या आधी तो ७,७७५.७0 आणि ७,८२१.४0 अंकांच्या मध्ये हिंदोळे घेताना दिसून आला.
हा आठवडा शेअर बाजारांसाठी घसरणीचा ठरला. सेन्सेक्स ४९0.0९ अंकांनी म्हणजेच १.८७ टक्क्यांनी, तर निफ्टी १६0.८0 अंकांनी म्हणजेच २.0२ टक्क्यांनी घसरला. सेन्सेक्समधील ३0 पैकी २६ कंपन्यांचे समभाग घसरले. एचडीएफसी लि. आणि एमअँडएमचे समभाग सर्वाधिक २.४२ टक्क्यांपर्यंत घसरले. एनटीपीसी, आयटीसी, आयसीआयसीआय बँक, टाटा मोटर्स आणि आरआयएल यांचे समभागही खाली आले.(वृत्तसंस्था)
सेन्सेक्स २४८ अंकांनी आपटला
युरोपीय बँकेने जाहीर केलेले प्रोत्साहन उपाययोजना असमाधानकारक सिद्ध झाल्यामुळे जगभरातील शेअर बाजारांत शुक्रवारी घसरण पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स
By admin | Updated: December 5, 2015 00:54 IST2015-12-05T00:54:51+5:302015-12-05T00:54:51+5:30
युरोपीय बँकेने जाहीर केलेले प्रोत्साहन उपाययोजना असमाधानकारक सिद्ध झाल्यामुळे जगभरातील शेअर बाजारांत शुक्रवारी घसरण पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स
