Lokmat Money > बिझनेस न्यूज > सेन्सेक्स १३0 अंकांनी घसरला

सेन्सेक्स १३0 अंकांनी घसरला

सोमवारी शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १३0.२५ अंकांनी अथवा 0.४४ टक्क्यांनी

By admin | Updated: March 21, 2017 00:43 IST2017-03-21T00:43:55+5:302017-03-21T00:43:55+5:30

सोमवारी शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १३0.२५ अंकांनी अथवा 0.४४ टक्क्यांनी

The Sensex lost 130 points | सेन्सेक्स १३0 अंकांनी घसरला

सेन्सेक्स १३0 अंकांनी घसरला

मुंबई : सोमवारी शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १३0.२५ अंकांनी अथवा 0.४४ टक्क्यांनी घसरून २९,५१८.७४ अंकांवर बंद झाला.
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ३३.२0 अंकांनी अथवा 0.३६ टक्क्यांनी घसरून ९,१२६.८५ अंकांवर बंद झाला. नफावसुलीचा फटका बाजारांना बसल्याचे सूत्रांनी सांगितले. सेन्सेक्समधील ३0 कंपन्यांपैकी अ‍ॅक्सिस बँकेचा समभाग सर्वाधिक २.४१ टक्क्यांनी घसरला. त्या खालोखाल आयसीआयसीआय बँकेचा समभाग १.९९ टक्क्यांनी घसरला. घसरण सोसावी लागलेल्या अन्य कंपन्यांत इन्फोसिस, टीसीएस, विप्रो, आरआयएल, टाटा स्टील, एलअँडटी, हिंद युनिलिव्हर, पॉवरग्रीड, मारुती सुझुकी आणि एमअँडएम यांचा समावेश आहे.
एनटीपीसी, कोल इंडिया, भारती एअरटेल, एचडीएफसी बँक, लुपीन, एचडीएफसी लि., ओएनजीसी, गेल आणि एशियन पेंट यांचे समभाग 0.८७ टक्क्यांपर्यंत वाढले. त्यामुळे सेन्सेक्सची घसरण मर्यादित राहिली.

Web Title: The Sensex lost 130 points

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.