Lokmat Money > बिझनेस न्यूज > सेन्सेक्स सुरुवातीला वाढला, नंतर ५० अंकांनी आपटला

सेन्सेक्स सुरुवातीला वाढला, नंतर ५० अंकांनी आपटला

सकाळी वाढ दर्शविणारा सेन्सेक्स नफा वसुलीचा फटका बसल्याने नंतर ५0 अंकांनी घसरून २७,४४0 अंकांवर बंद झाला.

By admin | Updated: May 5, 2015 22:34 IST2015-05-05T22:34:06+5:302015-05-05T22:34:06+5:30

सकाळी वाढ दर्शविणारा सेन्सेक्स नफा वसुलीचा फटका बसल्याने नंतर ५0 अंकांनी घसरून २७,४४0 अंकांवर बंद झाला.

The Sensex initially increased, then hit 50 points | सेन्सेक्स सुरुवातीला वाढला, नंतर ५० अंकांनी आपटला

सेन्सेक्स सुरुवातीला वाढला, नंतर ५० अंकांनी आपटला

मुंबई : सकाळी वाढ दर्शविणारा सेन्सेक्स नफा वसुलीचा फटका बसल्याने नंतर ५0 अंकांनी घसरून २७,४४0 अंकांवर बंद झाला. आशियाई बाजारांतील कमजोरी आणि कंपन्यांची कमजोर तिमाही कामगिरी यामुळे शेअर बाजारांना फटका बसला.
३0 कंपन्यांचा समावेश असलेला सेन्सेक्स सकाळी तेजीसह २७,५६१.३२ अंकांवर उघडला होता. नंतर तो २७,६0३.७१ अंकांपर्यंत वर चढला. दुपारच्या सत्रात नफा वसुलीचा जोर वाढल्याने बाजारातील तेजी पळाली. सत्र अखेरीस सेन्सेक्स २७,४४0.१४ अंकांवर बंद झाला. ५0.४५ अंकांची अथवा 0.१८ टक्क्यांची घसरण त्याने नोंदविली. काल सेन्सेक्सने ४७९.२८ अंकांची वाढ मिळविली होती.
५0 कंपन्यांच्या व्यापक आधारावरील राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ७.१५ अंकांनी अथवा 0.0९ टक्क्यांनी घसरून ८,३२४.८0 अंकांवर बंद झाला.
सेन्सेक्समधील ३0 पैकी १६ कंपन्यांचे समभाग घसरले. १४ कंपन्यांचे समभाग वाढले. तथापि, मीडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक वाढले. मीडकॅप 0.६0 टक्क्यांनी, तर मीडकॅप 0.0८ टक्क्यांनी वर चढले.
तत्पूर्वी, काल विदेशी गुंतवणूकदारांनी ६0.५३ कोटी रुपयांची समभाग खरेदी केली. आशियाई बाजारात आज मंदीची चाल दिसून आली. युरोपीय बाजारांत मात्र सकाळी तेजीचे वातावरण होते.
आशियाई बाजारातील मंदीचा भारतीय बाजारांवर परिणाम झाल्याचे ब्रोकरांनी सांगितले. (वृत्तसंस्था)

सेन्सेक्समध्ये एमअँडएमला सर्वाधिक २.२७ टक्क्यांची घसरण सोसावी लागली. एचडीएफसी, एसबीआय, सिप्ला, बजाज आॅटो, इन्फोसिस, कोल इंडिया, एचडीएफसी बँक, टाटा पॉवर, हीरो मोटोकॉर्प, एनटीपीसी, आयटीसी, भारती एअरटेल, अ‍ॅक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक आणि भेल यांचे समभागही घसरले.

Web Title: The Sensex initially increased, then hit 50 points

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.