Lokmat Money > बिझनेस न्यूज > सेन्सेक्स, निफ्टीने गाठली ऐतिहासिक उंची

सेन्सेक्स, निफ्टीने गाठली ऐतिहासिक उंची

सलग पाचव्या दिवशी तेजी साजरी करताना भारतीय शेअर बाजारांनी बुधवारी ऐतिहासिक उंची गाठली.

By admin | Updated: January 21, 2015 23:54 IST2015-01-21T23:54:03+5:302015-01-21T23:54:03+5:30

सलग पाचव्या दिवशी तेजी साजरी करताना भारतीय शेअर बाजारांनी बुधवारी ऐतिहासिक उंची गाठली.

The Sensex, the historical height reached by the Nifty | सेन्सेक्स, निफ्टीने गाठली ऐतिहासिक उंची

सेन्सेक्स, निफ्टीने गाठली ऐतिहासिक उंची

मुंबई : सलग पाचव्या दिवशी तेजी साजरी करताना भारतीय शेअर बाजारांनी बुधवारी ऐतिहासिक उंची गाठली. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने २८,९५८ अंकांना, तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने ८,७४१ अंकांना स्पर्श केला. आगामी अर्थसंकल्पाबद्दल गुंतवणूकदारांना आशा असल्यामुळे बाजाराने ही अभूतपूर्व तेजी पाहिली आहे.
टिकाऊ वस्तू, टेक, आयटी यासारख्या क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांना जबरदस्त मागणी आली. ३0 कंपन्यांचा समावेश असलेला सेन्सेक्स २८,९५८.१0 अंकांवर पाहोचला होता. हा सेन्सेक्सचा सार्वकालिक उच्चांक ठरला आहे. चीनचा शांघाय कंपोजिट हा निर्देशांक ४.७४ टक्क्यांनी वाढून आॅक्टोबर २00९ नंतरच्या सर्वोच्च पातळीवर गेला आहे. त्याचा लाभ भारतीय बाजारांना मिळाला.
सत्रअखेरीस सेन्सेक्स थोडा खाली आला आणि २८,८८८.८६ अंकांवर बंद झाला. कालच्या तुलनेत १0४.१९ अंकांची अथवा 0.३६ टक्क्यांची वाढ त्याने नोंदविली. गेल्या ५ व्यावसायिक सत्रांत सेन्सेक्सने १,५४२.0४ अंकांची अथवा ५.६४ टक्क्यांची वाढ नोंदविली आहे.
सेन्सेक्समधील एचयूएलने सर्वाधिक ४.९९ टक्के वाढ नोंदविली. भारती एअरटेल, एचडीएफसी, एसबीआय, कोल इंडिया आणि इन्फोसिस या कंपन्यांनीही चांगली वाढ नोंदविली. सेन्सेक्समध्ये समाविष्ट असलेल्या ३0 पैकी १८ कंपन्यांचे समभाग वाढले. १२ कंपन्यांचे समभाग घसरले. ५0 कंपन्यांचा समावेश असलेल्या निफ्टीने ८,१४१.८५ अंकांना स्पर्श केला. सत्रअखेरीस थोडासा खाली येऊन ८,७२९.५0 अंकांवर तो बंद झाला. ३३.९0 अंकांची अथवा 0.३९ टक्क्यांची वाढ त्याने नोंदविली.
केंद्र सरकारचा अर्थसंकल्प २८ फेब्रुवारी रोजी मांडला जाणार असल्याची घोषणा बुधवारी करण्यात आली. त्याआधी २७ फेब्रुवारीला आर्थिक सर्वेक्षण आणि २६ फेब्रुवारीला रेल्वे अर्थसंकल्प सादर होणार आहे. या घोषणांनी बाजारात उत्साह संचारला, असे ब्रोकरांनी सांगितले.
या तेजीच्या वातावरणातही घसरणीचा सामना करावा लागलेल्या कंपन्यांत आयटीसी, सिप्ला, एसएसएलटी, टाटा मोटर्स, टाटा स्टील आणि ओएनजीसी यांचा समावेश आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: The Sensex, the historical height reached by the Nifty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.