मुंबई : ब्ल्यू चिप कंपन्यांच्या समभागांत झालेल्या जोरदार खरेदीच्या बळावर मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सोमवारी १९५ अंकांनी उसळून २६,0३४.१३ अंकांवर बंद झाला. २६ हजार अंकांची पातळी ओलांडून वर चढलेला सेन्सेक्स आता एक महिन्याच्या उच्चांकावर गेला आहे.
आरोग्य सेवा, वाहन आणि बँकिंग या क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांना खरेदीचा लाभ मिळाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही ७,९00 अंकांचा टप्पा ओलांडून वर चढला आहे. ३0 कंपन्यांचा समावेश असलेला बीएसई सेन्सेक्स दिवसभर सकारात्मक टापूत राहिला. सत्राच्या अखेरीस १९५.४२ अंकांची अथवा 0.७६ टक्क्यांची वाढ नोंदवून तो २६,0३४.१३ अंकांवर बंद झाला. २ डिसेंबरनंतरची ही सर्वोच्च पातळी ठरली आहे. गुरुवारी सेन्सेक्स ११.५९ अंकांनी घसरला होता. शुक्रवारी नाताळानिमित्त बाजार बंद होता.
५0 कंपन्यांचा समावेश असलेला एनएसई निफ्टी ६४.१0 अंकांनी अथवा 0.८२ टक्क्यांनी वाढून ७,९२५.१५ अंकांवर बंद झाला. एका क्षणी तो ७,९३७.२0 अंकांवर गेला होता. तथापि, ही वाढ त्याला अखेरपर्यंत टिकविता आली नाही.
डॉ. रेड्डीजचा समभाग सर्वाधिक वाढून ३,११६.३५ रुपयांवर बंद झाला. एनटीपीसीचा समभाग ३.३८ टक्क्यांनी वाढला. टाटा मोटर्स, सन फार्मा, आरआयएल, ओएनजीसी, आयसीआयसीआय बँक, लुपीन, अडाणी पोर्टस्, सिप्ला, मारुती सुझुकी यांचे समभागही वाढले.
क्षेत्रनिहाय विचार करता बीएसई हेल्थकेअर निर्देशांक सर्वाधिक १.३४ टक्के वाढला. त्याखालोखाल आॅटो, पॉवर, बँकिंग, पीएसयू आणि तेल व गॅस या क्षेत्रांचे समभाग वाढले. व्यापक बाजारांतही वाढ दिसून आली. बीएसई स्मॉलकॅप 0.४७ टक्क्यांनी, तर मीडकॅप 0.१४ टक्क्यांनी वर चढला.
सेन्सेक्स महिन्याच्या उच्चांकावर
ब्ल्यू चिप कंपन्यांच्या समभागांत झालेल्या जोरदार खरेदीच्या बळावर मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सोमवारी १९५ अंकांनी उसळून २६,0३४.१३ अंकांवर बंद झाला. २६ हजार अंकांची
By admin | Updated: December 29, 2015 02:01 IST2015-12-29T02:01:41+5:302015-12-29T02:01:41+5:30
ब्ल्यू चिप कंपन्यांच्या समभागांत झालेल्या जोरदार खरेदीच्या बळावर मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सोमवारी १९५ अंकांनी उसळून २६,0३४.१३ अंकांवर बंद झाला. २६ हजार अंकांची
