मुंबई : मुंबई शेअरबाजाराच्या सेन्सेक्सने बुधवारी प्रथमच 28 हजारांची पातळीही पार केली असून, निफ्टीने 84क्क् ची पातळी ओलांडली आहे. क्रूड तेलाच्या घसरणा:या किमती व वाहन आणि बँकिंग क्षेत्रतील शेअर्सची विक्री यामुळे शेअरबाजारात पुन्हा तेजीचे वारे खेळू लागले आहेत.
3क् शेअर्सचा मुंबई निर्देशांकाने आज उच्चंक गाठत 28,126.48 वर ङोप घेतली; पण दिवसअखेर थोडासा खाली येत निर्देशांक 28,क्क्8.9क् वर बंद झाला. बीएसईने 2 सप्टेंबर रोजी 27 हजारांचा पल्ला पार केला होता. 5क् शेअर्सचा राष्ट्रीय निफ्टी निर्देशांक 84क्क् च्या पलीकडे गेला हाही उच्चंक आहे. मंगळवारी हा निर्देशांक 8,383.3क् या उच्चंकावर बंद झाला होता.
दोन्ही मार्केट तेजीत असून, दोन्ही बाजारांनी उच्चांक गाठले आहेत. कच्च्या तेलाच्या उतरणा:या किमती हे या तेजीचे मुख्य कारण आहे. आर्थिक क्षेत्रत आणखीही सुधारणा होतील अशा अपेक्षेने भावना सकारात्मक ठेवल्या आहेत, असे कोटक सिक्युरिटीजचे प्रमुख दीपेन शाह यांनी म्हटले आहे. परदेशी गुंतवणूकदारांनी मंगळवारी 458.क्4 कोटी रु चे शेअर खरेदी केले.
4आजच्या तेजीमुळे फायदा झालेल्या कंपन्यात अॅक्सिस बँक (3.क्2) बजाज ऑटो (2.1क् ) टाटा मोटार्स (1.71) आयटीसी (1.55 टक्के) आयसीआयसीआय (1.33) एचडीएफसी लि (1.12) या कंपन्यांनी निर्देशांक वाढण्यास हातभार लावला. सिप्ला, टाटा पॉवर, टाटा स्टील, एनटीपीसी या कंपन्यांचे नुकसान झाले.