मुंबई : रिझर्व्ह बँकेने यंदाच्या आपल्या पाचव्या द्विमासिक पतधोरण आढाव्यात धोरणात्मक व्याजदर कायम ठेवताना समावेशकता दाखविल्यामुळे सेन्सेक्स २३.७४ अंकांनी वाढून २६,९६९.४१ अंकांवर बंद झाला. हा तीन आठवड्यांचा उच्चांक ठरला आहे.
बीएसई सेन्सेक्स सकाळी सकारात्मकतेसह उघडला होता. सत्राच्या अखेरीस २३.७४ अंकांची अथवा 0.0९ टक्क्यांची वाढ नोंदवून तो २६,१६९.४१ अंकांवर बंद झाला. गेल्या तीन सत्रांत सेन्सेक्स ३६९.९२ अंकांनी वाढला आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १९.६५ अंकांनी अथवा 0.२५ टक्क्यांनी वाढून ७,९५४.९0 अंकांवर बंद झाला. त्या आधी तो ७,९७२.१५ आणि ७,९३४.१५ अंकांच्या मध्ये हिंदोळे घेताना दिसून आला. धातू क्षेत्रातील कंपन्यांना तेजीचा लाभ मिळाला. वेदांता, टाटा स्टील, हिंदाल्को या कंपन्यांचे समभाग ४.६६ टक्क्यांपर्यंत वाढले. जागतिक पातळीवर धातूंच्या किमती वाढल्यामुळे या कंपन्यांना लाभ झाला. काल विदेशी गुंतवणूकदारांनी बाजारात १,0४३.८४ कोटी रुपयांचे समभाग विकल्याचे दिसून आले.
- सेन्सेक्समध्ये समाविष्ट असलेल्या ३0 पैकी १६ कंपन्यांचे समभाग वाढीसह बंद झाले. ठळक लाभधारक कंपन्यांत कोल इंडिया, डॉ. रेड्डीज, हिंद युनिलिव्हर, विप्रो आणि एनटीपीसी यांचा समावेश आहे. क्षेत्रनिहाय विचार करता बीएसई मेटल ३.१८ टक्क्यांनी वाढला.
पतधोरण आढाव्यामुळे सेन्सेक्स तेजीत
रिझर्व्ह बँकेने यंदाच्या आपल्या पाचव्या द्विमासिक पतधोरण आढाव्यात धोरणात्मक व्याजदर कायम ठेवताना समावेशकता दाखविल्यामुळे सेन्सेक्स २३.७४ अंकांनी
By admin | Updated: December 2, 2015 00:56 IST2015-12-02T00:56:24+5:302015-12-02T00:56:24+5:30
रिझर्व्ह बँकेने यंदाच्या आपल्या पाचव्या द्विमासिक पतधोरण आढाव्यात धोरणात्मक व्याजदर कायम ठेवताना समावेशकता दाखविल्यामुळे सेन्सेक्स २३.७४ अंकांनी
