मुंबई : अलीकडे मोठ्या प्रमाणात मार खाणाऱ्या ब्ल्यू चीप कंपन्यांच्या समभागांना जबरदस्त मागणी आल्यामुळे सोमवारी भारतीय शेअर बाजारांत तेजी परतली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १४९.५७ अंकांनी वाढून २५,७६0.१0 अंकांनी बंद झाला.
व्यापक आधारावरील ५0 कंपन्यांचा राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी पुन्हा एकदा ७,८00 अंकांच्या पार गेला आहे. ४४.३५ अंकांनी अथवा 0.५७ टक्क्यांनी वाढलेला निफ्टी ७,८0६.६0 अंकांवर बंद झाला. बाजारातील सूत्रांनी सांगितले की, सकाळी शेअर बाजार नरमाईने उघडले होते. ३0 कंपन्यांचा समावेश असलेला सेन्सेक्स सकाळी २५,४५१.४२ अंकांपर्यंत घसरला होता. ही सेन्सेक्सची दोन महिन्यांची नीचांकी पातळी ठरली होती. दुपारच्या सत्रात सेन्सेक्समध्ये अचानक तेजी आली. एका क्षणी तो २५,८६६.४२ अंकांपर्यंत वर चढला होता. सत्राच्या अखेरीस १४९.५७ अंकांची अथवा 0.५८ टक्क्यांची वाढ मिळवून सेन्सेक्स २५,७६0.0२ अंकांवर बंद झाला.
बँकिंग, रिअल्टी, हेल्थकेअर आणि कॅपिटल गुडस् या क्षेत्रातील कंपन्यांनी सेन्सेक्सची तेजी परत आणली. ठोक किंमत निर्देशांकावर आधारित महागाईचा दर आॅक्टोबरमध्ये वाढून उणे (-) ३.८१ टक्क्यांवर गेला आहे. याचाच अर्थ मागणीत वाढ होत असल्याचे दिसून येते. याचा सुयोग्य परिणाम बाजारावर झाल्याचे जाणकारांनी सांगितले.
सेन्सेक्समधील ३0 पैकी २२ कंपन्यांचे समभाग वाढले. गेलचा समभाग सर्वाधिक ४.६२ टक्क्यांनी वाढला. त्यापाठोपाठ टाटा स्टीलचा समभाग ३.४४ टक्के वाढला. याशिवाय डॉ. रेड्डीज, एसबीआय, वेदांता आणि आयटीसी या कंपन्यांचे समभागही वाढले. क्षेत्रनिहाय विचार करता बँकेक्स सर्वाधिक १.५१ टक्क्यांनी वाढला. त्याखालोखाल कॅपिटल गुडस्, एफएमसीजी आणि हेल्थकेअर यांचे समभाग वाढले.
सेन्सेक्स १५0 अंकांनी वाढला
अलीकडे मोठ्या प्रमाणात मार खाणाऱ्या ब्ल्यू चीप कंपन्यांच्या समभागांना जबरदस्त मागणी आल्यामुळे सोमवारी भारतीय शेअर बाजारांत तेजी परतली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स
By admin | Updated: November 17, 2015 03:01 IST2015-11-17T03:01:52+5:302015-11-17T03:01:52+5:30
अलीकडे मोठ्या प्रमाणात मार खाणाऱ्या ब्ल्यू चीप कंपन्यांच्या समभागांना जबरदस्त मागणी आल्यामुळे सोमवारी भारतीय शेअर बाजारांत तेजी परतली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स
