मुंबई : सलग तिसऱ्या व्यावसायिक सत्रात तेजीची नोंद करताना शेअर बाजाराने शुक्रवारी मोठी उसळी घेतली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ४0९.२१ अंकांनी वाढून २८,११४.५६ अंकांवर बंद झाला. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये भांडवल ओतण्याची घोषणा केंद्र सरकारने केल्यामुळे बँकिंग समभागांत मोठी खरेदी झाली. त्या बळावर सेन्सेक्सने मोठी झेप घेण्यात यश मिळविले.
भविष्य निर्वाह निधी संघटना येत्या ६ आॅगस्टपासून शेअर बाजारात ५ टक्के निधी गुंतविणार आहे. या निर्णयाचाही बाजारावर सकारात्मक परिणाम झाल्याचे दिसून आले.
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी पुन्हा एकदा ८,५00 अंकांच्या वर गेला. १११.0५ अंकांची अथवा १.३२ टक्क्यांची वाढ नोंदवून सेन्सेक्स ८,५३२.८५ अंकांवर बंद झाला. ८,५४८.९५ अंक ही त्याची दिवसभरातील सर्वोच्च पातळी राहिली.
मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सकाळी २७,८१४.५१ अंकांवर तेजीसह उघडला. त्यानंतर त्याने आणखी झेप घेऊन २८ हजार अंकांचा टप्पा ओलांडला. सत्राच्या अखेरीस तो २८,११४.५६ अंकांवर बंद झाला. ४0९.२१ अंकांची अथवा १.४८ टक्क्यांची घसघशीत वाढ त्याने मिळविली.
ही सेन्सेक्सची महिनाभराच्या काळातील सर्वोत्तम वाढ ठरली आहे. या आधी २२ जून रोजी सेन्सेक्स ४१४.0४ अंकांनी वाढला होता. गेल्या तीन दिवसांतील तेजीने सेन्सेक्स एकूण ६५५.३३ अंकांनी वाढला आहे. साप्ताहिक आधारावर मात्र सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही निर्देशांक जवळपास स्थिर राहिले आहेत.
क्षेत्रनिहाय विचार करता रिअल्टी, आरोग्य या क्षेत्राचे निर्देशांक 0.३९ टक्क्यापर्यंत वाढले. ऊर्जा आणि तेल व गॅस क्षेत्राचे निर्देशांक 0.६0 टक्क्यांपर्यंत घसरले. मीडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक १.0३ टक्क्यांपर्यंत वाढले. (वृत्तसंस्था)
सेन्सेक्स ४0९ अंकांनी उसळला
सलग तिसऱ्या व्यावसायिक सत्रात तेजीची नोंद करताना शेअर बाजाराने शुक्रवारी मोठी उसळी घेतली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ४0९.२१ अंकांनी वाढून २८,११४.५६ अंकांवर बंद झाला.
By admin | Updated: August 1, 2015 01:50 IST2015-08-01T01:50:48+5:302015-08-01T01:50:48+5:30
सलग तिसऱ्या व्यावसायिक सत्रात तेजीची नोंद करताना शेअर बाजाराने शुक्रवारी मोठी उसळी घेतली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ४0९.२१ अंकांनी वाढून २८,११४.५६ अंकांवर बंद झाला.
