मुंबई : शेअर बाजारांत आठवड्याच्या शुक्रवारी शेवटच्या दिवशी तेजी पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १६१ अंकांनी वाढून २६ हजार अंकांच्या वर स्थिर झाला.
अमेरिकी अर्थव्यवस्था अपेक्षेपेक्षा जास्त वेगाने वाढत असल्याचे ताज्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. अमेरिकेचे सकल राष्ट्रीय उत्पन्न दुसऱ्या तिमाहीत ३.७ टक्क्यांनी वाढले. सर्व अंदाजांवर त्याने मात केली आहे. या आकडेवारीने शेअर बाजारांना बळ मिळाले आहे.
३0 कंपन्यांचा समावेश असलेला सेन्सेक्स सकाळी २६,५४२.८४ अंकांवर तेजीसह उघडला होता. त्यानंतर तो आणखी वर चढून २६,६८७.३३ अंकांवर गेला. या टप्प्यावर नफा वसुलीचे सत्र सुरू झाले. त्यामुळे सेन्सेक्सला सुरुवातीला मिळालेली वाढ कमी झाली.
सेन्सेक्स १६१ अंकांनी वाढला
शेअर बाजारांत आठवड्याच्या शुक्रवारी शेवटच्या दिवशी तेजी पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १६१ अंकांनी वाढून २६ हजार अंकांच्या वर स्थिर झाला.
By admin | Updated: August 28, 2015 23:46 IST2015-08-28T23:46:13+5:302015-08-28T23:46:13+5:30
शेअर बाजारांत आठवड्याच्या शुक्रवारी शेवटच्या दिवशी तेजी पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १६१ अंकांनी वाढून २६ हजार अंकांच्या वर स्थिर झाला.
