मुंबई : अखेरच्या तासात विक्रीचे व्यवहार वाढल्यामुळे मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने (सेन्सेक्स) मंगळवारी सुरुवातीचा लाभ गमावला आणि तो ३० अंकांच्या नुकसानीसह नऊ आठवड्यांच्या नीचांकी स्तरावर बंद झाला.
भांडवलाचा ओघ व आशियाई विकास बँकेने (एडीबी) भारतीय अर्थव्यवस्थेच्या वृद्धीदराचे आकर्षक चित्र मांडले असताना मुंबई शेअर बाजाराचा ३० शेअर्सचा निर्देशांक एकवेळ २६३ अंकांनी वाढून २८,४५५,३२ अंकाच्या उच्च पातळीवर गेला होता; मात्र व्यवहाराच्या अखेरच्या तासात वाहन, बँकिंग आणि आयटी शेअरचे विक्री व्यवहार वाढल्यामुळे बाजारात घसरण झाली आणि अखेरीस निर्देशांक ३०.३० अंक किंवा ०.११ टक्क्यांच्या नुकसानीने २८,१६१,७२ अंकांवर बंद झाला. निर्देशाकांचा गेल्या नऊ आठवड्यांतील हा नीचांक आहे. व्यवहारादरम्यान तो एक वेळ २८,१३०,०९ अंकापर्यंत नीचांकी पातळीवर गेला होता. पाच सत्रांत निर्देशांकाने ५७४.६६ अंकाचे नुकसान नोंदवले आहे. त्याचप्रमाणे नॅशनल स्टॉक मार्केटचा निफ्टी ७.९५ अंक किंवा ०.०९ टक्के नुकसानीसह ८,५४२,९५ अंकावर बंद झाला. व्यवहारादरम्यान तो ८,५३५,८५ ते ८,६२७,७५ अंक या परिघात राहिला. पाच सत्रांत निफ्टीत १८० अंकांची घसरण झाली. निर्देशांकाच्या कंपन्यांत टाटा मोटर्स, एचडीएफसी बँक, इन्फोसिस, एसबीआय, आयसीआयसीआय बँक, हिंद युनिलिव्हर व हीरो मोटोकार्प या कंपन्यांचे नुकसान झाले. टाटा मोटर्सच्या संचालक मंडळाची बुधवारी बैठक होणार आहे. त्याच्या एक दिवस आधी या कंपनीचा शेअर ३.२७ टक्क्यांनी घसरला. निर्देशाकांतील कंपन्यांत टाटा मोटर्सच्याच शेअरचे सर्वाधिक नुकसान झाले. एचडीएफसी, भारती एअरटेल, सन फार्मा, रिलायन्स इंडस्ट्रीज, डॉ. रेड्डीज लॅब व विप्रोला फायदा झाल्यामुळे बाजाराची घसरण काही प्रमाणात मर्यादित राहिली.
पाचव्या दिवशीही सेन्सेक्स कोसळला
अखेरच्या तासात विक्रीचे व्यवहार वाढल्यामुळे मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने (सेन्सेक्स) मंगळवारी सुरुवातीचा लाभ गमावला आणि तो ३० अंकांच्या नुकसानीसह नऊ आठवड्यांच्या नीचांकी स्तरावर बंद झाला.
By admin | Updated: March 24, 2015 23:42 IST2015-03-24T23:42:36+5:302015-03-24T23:42:36+5:30
अखेरच्या तासात विक्रीचे व्यवहार वाढल्यामुळे मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने (सेन्सेक्स) मंगळवारी सुरुवातीचा लाभ गमावला आणि तो ३० अंकांच्या नुकसानीसह नऊ आठवड्यांच्या नीचांकी स्तरावर बंद झाला.
