मुंबई : औद्योगिक उत्पादन घसरल्याने बाजारात निराशा पसरली आहे. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ३१ अंकांनी कोसळून २७,३१९.५६ अंकांवर बंद झाला. घसरणीचा हा सलग तिसरा दिवस असून, सेन्सेक्सने दीड महिन्याची नीचांकी पातळी गाठली आहे.
ब्रोकरांनी सांगितले की, रुपयाची घसरण झाल्याचा परिणामही सेन्सेक्सवर दिसून आला. १ डॉलरची किंमत ६३ रुपयांच्या पातळीजवळ गेला आहे. ६५ पैसे गमावलेला रुपया आज एक डॉलरला ६२.९४ रुपये असा झाला.
औद्योगिक उत्पादन घटल्यामुळे सकाळी बाजार उघडल्यानंतर सेन्सेक्स २४५ अंकांनी खाली आला; मात्र नंतर ठोक महागाईचा दर शून्यावर आल्याचे वृत्त आल्याने खरेदीचा जोर वाढला. सेन्सेक्स वर चढू लागताच नफा वसुली सुरू झाली. या परिस्थितीत सत्र अखेरीस ३१.१२ अंकांची अथवा 0.११ टक्क्यांची घसरण नोंदवून सेन्सेक्स २७,३१९.५६ अंकांवर बंद झाला.
५0 कंपन्यांचा समावेश असलेला व्यापक आधारावरील सीएनएक्स निफ्टी सकाळी ८,२00 अंकांच्या खाली आला होता. नंतर तो ८,२१९.६0 अंकांवर बंद झाला. ४.५0 अंकांची अथवा 0.0५ टक्क्यांची घसरण त्याने नोंदविली. आशियाई बाजारात संमिश्र कल दिसून आला. चीन वगळता इतर सर्व बाजार घसरले. ०.०७ टक्के ते १.५७ टक्के अशी ही घसरण होती. सकाळच्या सत्रात युरोपीय बाजार तेजीत दिसून आले. सीएसी ०.६३ टक्के, डीएएक्स ०.७६ टक्के, तर एफटीएसई ०.६५ टक्के वाढ दर्शवीत होता.
सेन्सेक्स ३१ अंकांनी कोसळला
औद्योगिक उत्पादन घसरल्याने बाजारात निराशा पसरली आहे. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ३१ अंकांनी कोसळून २७,३१९.५६ अंकांवर बंद झाला.
By admin | Updated: December 16, 2014 05:02 IST2014-12-16T05:02:24+5:302014-12-16T05:02:24+5:30
औद्योगिक उत्पादन घसरल्याने बाजारात निराशा पसरली आहे. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ३१ अंकांनी कोसळून २७,३१९.५६ अंकांवर बंद झाला.
