मुुंबई : शेअर बाजारांत आज सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ३५१ अंकांनी घसरून २७ हजार अंकांच्या खाली आला. रिअल्टी आणि एफएमसीसी क्षेत्रात प्रचंड प्रमाणात विक्री झाल्यामुळे बाजार गडगडला आहे.
गेल्या दोन सत्रांत मिळून सेन्सेक्सने १,0११.७९ अंक गमावले आहेत. मान्सून कमजोर राहणार असल्याचा अंदाज आणि १३ महिन्यांत प्रथमच घसरलेले सेवा क्षेत्र यामुळे शेअर बाजाराला फटका बसला असल्याचे ब्रोकरांनी सांगितले.
सेन्सेक्स सकाळी सकारात्मक झोनमध्ये होता. त्यानंतर मात्र विक्रीचा जोरदार मारा सुरू झाला आणि निर्देशांक घसरणीला लागला. सत्र अखेरीस ३५१.१८ अंकांची अथवा १.२९ टक्क्यांची घसरण नोंदवून सेन्सेक्स २६,८३७.२0 अंकांवर बंद झाला. ७ मे नंतरच्या काळातील ही सर्वाधिक नीचांकी पातळी ठरली आहे. ७ मे रोजी सेन्सेक्स २६,५९९.११ अंकांवर बंद झाला होता.
५0 कंपन्यांचा समावेश असलेला व्यापक आधारावरील नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा निफ्टी ८,१३५.१0 अंकांवर बंद झाला. १0१.३५ अंकांची अथवा १.२३ टक्क्यांची घसरण निफ्टीने नोंदविली.
रिझर्व्ह बँकेने काल धोरणात्मक व्याजदरात २५ बेसिक पॉइंटांची कपात केली होती. बाजाराला ५0 पॉइंटांची कपात अपेक्षित होती. या पार्श्वभूमीवर बाजारात निराशेचे वातावरण असल्याचे सांगण्यात आले.
३0 कंपन्यांचा समावेश असलेल्या सेन्सेक्समधील २४ कंपन्यांचे समभाग घसरले. टाटा पॉवरचा समभाग सर्वाधिक ६.१३ टक्क्यांनी घसरला. याशिवाय आयटीसी, ओएनजीसी, वेदांता, गेल, एसबीआय, आयसीआयसीआय बँक, हूल, टाटा मोटर्स, सन फार्मा, भेल, टाटा स्टील, एमअँडएम, डॉ. रेड्डीज लॅब, मारुती, बजाज आॅटो, एलअँडटी, हीरो मोटोकॉर्प आणि हिंदाल्को यांचे समभागही घसरले. (वृत्तसंस्था)
सेन्सेक्स आला २७ हजारांच्या खाली
शेअर बाजारांत आज सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ३५१ अंकांनी घसरून २७ हजार अंकांच्या खाली आला
By admin | Updated: June 4, 2015 00:49 IST2015-06-04T00:49:11+5:302015-06-04T00:49:11+5:30
शेअर बाजारांत आज सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ३५१ अंकांनी घसरून २७ हजार अंकांच्या खाली आला
