मुंबई : बीएसई सेन्सेक्स सोमवारी २४५ अंकांनी घसरून २६,५२३.0९ अंकांवर बंद झाला. ही सेन्सेक्सची आठ महिन्यांची नीचांकी पातळी ठरली आहे. दुष्काळाची भीती आणि रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा यामुळे एफएमसीजी क्षेत्रात विक्रीचा प्रचंड मारा झाला. त्याचा फटका बाजाराला बसला.
३0 कंपन्यांचा समावेश असलेल्या सेन्सेक्सने गेल्या पाच व्यावसायिक सत्रांत तब्बल १,३२६ अंक गमावले आहेत. ५0 कंपन्यांचा समावेश असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीनेही सलग सहाव्या सत्रात घसरण नोंदविली आहे. ७0.५५ अकांच्या घसरणीनंतर निफ्टी ८,0४४.१५ अंकांवर बंद झाला. ही घसरण 0.८७ टक्के आहे.
अमेरिकेची अर्थव्यवस्था सुधारत आहे. अमेरिकेच्या रोजगाराची आकडेवारी अपेक्षेपेक्षा जास्त उत्तम राहिली आहे. त्यामुळे फेडरल रिझर्व्हकडून यंदाच व्याजदर वाढविण्याची शक्यता निर्माण झाली आहे, असे झाल्यास बाजारात
येणारा पैशांचा ओघ थांबेल. या भीतीचा फटकाही भारतीय बाजारांना बसला.
खरे म्हणजे सकाळी सेन्सेक्स तेजीसह २६,८१४.३१ अंकांवर उघडला होता. त्यानंतर तो आणखी वाढून २६,८२७.0५ अंकांपर्यंत वर चढला. त्यानंतर मात्र नफा वसुलीचे सत्र सुरू झाले. त्यामुळे बाजार खाली आला. एका क्षणी सेन्सेक्स २६,४७२.८७ अंकांपर्यंत खाली गेला होता. सत्र अखेरीस 0.९२ टक्क्यांची अथवा २४५.४0 अंकांची घसरण नोंदवून सेन्सेक्स २६,५२३.0९ अंकांवर बंद झाला. २0 आॅक्टोबर २0१४ रोजी सेन्सेक्स या पातळीवर होता. (वृत्तसंस्था)
> सेन्सेक्समध्ये समाविष्ट असलेल्या ३0 पैकी २५ कंपन्यांचे समभाग घसरले. विक्रीचा दबाव एवढा होता की, बीएसई मीडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकांनाही फटका बसला
> मीडकॅप १.५४ टक्क्यांनी तर स्मॉलकॅप १.४२ टक्क्यांनी घसरला. टिकाऊ वस्तूंचा निर्देशांक सर्वाधिक १.९४ टक्क्यांनी घसरला. त्यापाठोपाठ धातू निर्देशांक १.७३ टक्के, तेल आणि वायू १.५५ टक्के, एफएमसीजी १.५२ टक्के आणि आरोग्य १.१७ टक्के घसरला.
> आशियाई बाजारांत संमिश्र कल दिसून आला. युरोपीय बाजारात सकाळच्या सत्रात विक्रीचा दिसून आला.
सेन्सेक्स ८ महिन्यांच्या नीचांकावर
बीएसई सेन्सेक्स सोमवारी २४५ अंकांनी घसरून २६,५२३.0९ अंकांवर बंद झाला. ही सेन्सेक्सची आठ महिन्यांची नीचांकी पातळी ठरली आहे.
By admin | Updated: June 8, 2015 23:41 IST2015-06-08T23:41:40+5:302015-06-08T23:41:40+5:30
बीएसई सेन्सेक्स सोमवारी २४५ अंकांनी घसरून २६,५२३.0९ अंकांवर बंद झाला. ही सेन्सेक्सची आठ महिन्यांची नीचांकी पातळी ठरली आहे.
