मुंबई : रिझर्व्ह बँकेकडून मंगळवारी पतधोरण आढावा जाहीर केला जाणार असल्यामुळे सोमवारी शेअर बाजारात नरमाईचे वातावरण दिसून आले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हे दोन्ही निर्देशांक घसरले.
सेन्सेक्स सकाळी तेजीसह उघडला होता. तथापि, नंतर विक्रीचा जोर वाढल्याने तो खाली आला. सत्राच्या अखेरीस सेन्सेक्स ६५.५८ अंकांनी अथवा 0.२४ टक्क्यांनी घसरून २६,७७७.४५ अंकांवर बंद झाला. शुक्रवारी सेन्सेक्स 0.११ टक्क्यांनी घसरला होता.
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १९.७५ अंकांनी अथवा 0.२४ टक्क्यांनी घसरून ८,२0१.0५ अंकांवर बंद झाला. आयटी क्षेत्रातील टीसीएस आणि विप्रो यांसारख्या कंपन्यांवर विक्रीचा दबाव राहिला. त्यांचे समभाग 0.८३ टक्क्यांपर्यंत घसरले. डॉलर कमजोर झाल्याचा फटका या कंपन्यांना बसला. या कंपन्यांचा ६0 टक्के महसूल अमेरिकी डॉलरमध्ये येतो. त्यामुळे डॉलर कमजोर होताच, त्यांचे समभाग घसरतात.
सेन्सेक्समध्ये समाविष्ट असलेल्या ३0पैकी २१ कंपन्यांचे समभाग घसरले. घसरण सोसणाऱ्या बड्या कंपन्यांत भारती एअरटेल, लुपीन, मारुती सुझुकी, सन फार्मा, अॅक्सिस बँक, हीरो मोटोकॉर्प आणि कोल इंडिया यांचा समावेश आहे. टाटा मोटर्स, एमअॅण्डएम, गेल, सिप्ला, आयटीसी, भेल यांचे समभाग १.५१ टक्क्यांनी वाढले.
व्यापक बाजारात मात्र तेजीचे वारे वाहताना दिसून आले. मीडकॅप निर्देशांक 0.0९ टक्क्यांनी, तर स्मॉलकॅप निर्देशांक 0.२२ टक्क्यांनी वर चढला.
आशियाई बाजारात संमिश्र कल दिसून आला. जपानचा निक्केई 0.३७ टक्क्यांनी घसरला. चीनचा शांघाय कंपोजिट 0.१६ टक्क्यांनी उतरला, तर हाँगकाँगचा हँग सेंग मात्र 0.४0 टक्क्यांनी वाढला.
>दागिने निर्माते आणि ग्राहक यांनी खरेदीत हात आखडता घेतल्यामुळे सोमवारी राजधानी दिल्लीत सोन्याच्या भावात घसरण झाली. चांदीचा भाव मात्र स्थिर राहिला. सोने १८५ रुपयांनी घसरून २९,0४0 रुपये प्रति १0 ग्रॅम झाले, तर चांदी ३९,२00 रुपये किलो अशी आदल्या सत्राच्या पातळीवर कायम राहिली.
जागतिक बाजारातही नरमाईचाच कल दिसून आला. सिंगापुरात सोने 0.१८ टक्क्यांनी घसरून १,२४१.२0 डॉलर प्रति औंस झाले, तसेच चांदी 0.0३ टक्के घसरून १६.३८ डॉलर प्रति औंस झाली.
दिल्लीत ९९.९ टक्के आणि ९९.५
टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येकी १८५ रुपयांनी घसरून अनुक्रमे २९,0४0 रुपये आणि २८,८९0 रुपये प्रति १0 ग्रॅम झाला. शनिवारी सोने ५0५ रुपयांनी महागले होते. सोन्याच्या आठ ग्रॅमच्या गिन्नीचा भाव मात्र १00 रुपयांनी वाढून २२,९00 रुपये झाला.
दिल्लीत तयार चांदीचा भाव ३९,२00 रुपये
किलो असा स्थिर राहिला. तथापि, साप्ताहिक डिलिव्हरीच्या चांदीचा भाव मात्र ७५ रुपयांनी
वाढून ३९,१५५ रुपये किलो झाला.
सेन्सेक्स ६६ अंकांनी घसरला
रिझर्व्ह बँकेकडून मंगळवारी पतधोरण आढावा जाहीर केला जाणार असल्यामुळे सोमवारी शेअर बाजारात नरमाईचे वातावरण दिसून आले.
By admin | Updated: June 7, 2016 07:44 IST2016-06-07T07:44:24+5:302016-06-07T07:44:24+5:30
रिझर्व्ह बँकेकडून मंगळवारी पतधोरण आढावा जाहीर केला जाणार असल्यामुळे सोमवारी शेअर बाजारात नरमाईचे वातावरण दिसून आले.
