मुंबई : नफावसुलीचा जोर वाढल्यामुळे गुरुवारी शेअर बाजारात घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराचा निफ्टी २५७ अंकांनी घसरून २७ हजार अंकांच्या खाली उतरला. सेन्सेक्सने गेल्या २ दिवसांत २४३.२१ अंकांची झेप घेतली होती. या तेजीला गुरुवारी ब्रेक लागला. सेन्सेक्स २५७.२0 अंकांनी अथवा 0.९५ टक्क्याने घसरून २६,७६३.४६ अंकांवर बंद झाला.
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ८,२00 अंकांच्या खाली घसरला होता. तथापि, नंतर खरेदीचा जोर वाढल्याने तो वर चढला. सत्राच्या अखेरीस ६९.४५ अंकांनी अथवा 0.८४ टक्क्याची वाढ नोंदवून निफ्टी ८,२0३.६0 अंकांवर बंद झाला. गुरुवारी सकाळी बाजार घसरणीसह उघडले होते. दिवसभर नरमाईचाच जोर बाजारात राहिला. (प्रतिनिधी)
सेन्सेक्स २५७ अंकांनी घसरला
नफावसुलीचा जोर वाढल्यामुळे गुरुवारी शेअर बाजारात घसरण झाली
By admin | Updated: June 10, 2016 04:17 IST2016-06-10T04:17:53+5:302016-06-10T04:17:53+5:30
नफावसुलीचा जोर वाढल्यामुळे गुरुवारी शेअर बाजारात घसरण झाली
