Lokmat Money > बिझनेस न्यूज > सेन्सेक्स २३८ अंकांनी घसरला

सेन्सेक्स २३८ अंकांनी घसरला

दिवसभर तेजी असताना अखेरच्या टप्प्यात विक्रीचा प्रचंड मारा झाल्याने मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २३८ अंकांनी कोसळला. सन फार्माच्या समभागाचे

By admin | Updated: July 21, 2015 22:57 IST2015-07-21T22:57:31+5:302015-07-21T22:57:31+5:30

दिवसभर तेजी असताना अखेरच्या टप्प्यात विक्रीचा प्रचंड मारा झाल्याने मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २३८ अंकांनी कोसळला. सन फार्माच्या समभागाचे

The Sensex dropped by 238 points | सेन्सेक्स २३८ अंकांनी घसरला

सेन्सेक्स २३८ अंकांनी घसरला

मुंबई : दिवसभर तेजी असताना अखेरच्या टप्प्यात विक्रीचा प्रचंड मारा झाल्याने मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २३८ अंकांनी कोसळला. सन फार्माच्या समभागाचे भाव गडगडल्यामुळे निर्माण झालेल्या घबराटीच्या वातावरणामुळे बाजार कोसळला. बँकिंग आणि एफएमसीजी या क्षेत्रातील कंपन्यांचे समभागही गडगडले.
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत उत्तम कामगिरी करणाऱ्या इन्फोसिसचा समभाग ११ टक्क्यांनी वाढला. त्यामुळे बाजाराची घसरण थोडी आटोक्यात राहिली. ब्रोकरांनी सांगितले की, जमीन अधिग्रहण आणि वस्तू व सेवाकर विधेयकाबाबतच्या चिंतांमुळे बाजाराची धारणा नकारात्मक बनली आहे.
३0 कंपन्यांचा समावेश असलेला बीएसई सेन्सेक्स २३७.९८ अंकांनी अथवा 0.८४ टक्क्यांनी घसरून २८,१८२.१४ अंकांवर बंद झाला. आयटी आणि टेक वगळता अन्य सर्व क्षेत्रीय निर्देशांक घसरले. आजची घसरण ८ जुलैच्या घसरणीनंतरची सर्वांत मोठी घसरण ठरली आहे. त्या दिवशी सेन्सेक्स ४८३.९७ अंकांनी घसरला होता.
सेन्सेक्सप्रमाणेच निफ्टीही आपटून ८,६00 अंकांच्या खाली आला. ७४.00 अंकांची अथवा 0.८६ टक्क्यांची घसरण नोंदवून निफ्टी ८,५२९.४५ अंकांवर बंद झाला.
औषधी क्षेत्रातील बडी कंपनी सन फार्माचे समभाग सर्वाधिक १४.९५ टक्क्यांनी घसरले. आज एकाच दिवसात ८0५.३0 रुपयांची घसरण कंपनीला सोसावी लागली. सन फार्माशी संबंधित सूत्रांनी सांगितले की, रॅनबॅक्सीसोबत एकीकरण प्रक्रिया राबविल्यामुळे चालू आर्थिक वर्षात आपला नफा घटू शकतो, अशी घोषणा सन फार्माच्या वतीने करण्यात आली. त्याचा फटका कंपनीला बसला.
बाजारातील घसरणीचा कल व्यापक असल्याचे दिसून आले. बीएसई स्मॉलकॅप आणि मीडकॅप १.५९ टक्क्यांपर्यंत घसरले.
जागतिक पातळीवर आशियाई बाजारात वाढीचा कल दिसून आला. याउलट युरोपीय बाजारात संमिश्र स्वरूपाचा कल दिसून आला. (वृत्तसंस्था)

Web Title: The Sensex dropped by 238 points

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.