मुंबई : मंगळवारी रिझर्व्ह बँकेचा पतधोरण आढावा जाहीर होणार असल्यामुळे सोमवारी शेअर बाजारांत सावध वातावरण दिसून आले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ६१ अंकांनी कोसळून २९,१२२.२७ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ११.५0 अंकांनी कोसळून ८,७९७.४0 अंकांवर बंद झाला. दोन्ही निर्देशांक एका आठवड्याच्या नीचांकी पातळीवर गेले आहेत.
शेअर बाजारांच्या घसरणीमागे नफावसुली, काही ब्ल्यूचिप कंपन्यांची असमाधानकारक तिमाही कामगिरी आणि जागतिक बाजारांतील पीछेहाट ही आणखी कारणे दिसून आली.
बीएसई सेन्सेक्स सकाळी मंदीसह २९,१४३.६३ अंकांवर उघडला. नंतर घसरून २८,९५८.५२ अंकांपर्यंत खाली गेला. दुपारनंतर त्यात थोडी सुधारणा झाली. त्यामुळे सेन्सेक्स २९ हजार अंकांची पातळी ओलांडून वर चढू शकला. ६0.६८ अंक अथवा 0.२१ टक्के घसरण नोंदवून सेन्सेक्स २९,१२२.२७ अंकांवर बंद झाला. २२ जोनवारी रोजी सेन्सेक्स २९,00६.0२ अंकांवर बंद झाला होता. त्यानंतरही ही सर्वांत खालची पातळी ठरली आहे. गेल्या दोन सत्रांत मिळून सेन्सेक्सने ५५९.५0 अंक अथवा १.८९ टक्क्यांची घसरण नोंदविली आहे.
सध्याची अर्थव्यवस्थेची स्थिती धोरणात्मक व्याजदरांत कपात करण्यासाठी पोषक आहे, असे काही अर्थतज्ज्ञांना वाटते. या पार्श्वभूमीवर उद्याच्या पतधोरण आढाव्याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. तथापि, अन्य काही तज्ज्ञांच्या मते रिझर्व्ह बँकेकडून तूर्तास तरी व्याजदर जैसे थे ठेवण्यावरच भर दिला जाईल.
सेन्सेक्समधील ३0 कंपन्यांपैकी १७ कंपन्यांचे समभाग घसरले. १३ कंपन्यांचे समभाग वाढले. घसरण सोसावी लागलेल्या बड्या कंपन्यांत भारती एअरटेल, डॉ. रेड्डीज लॅब, आयसीआयसीआय बँक, आयटीसी, सेसा स्टरलाईट, बजाज आॅटो आणि टाटा स्टील यांचा समावेश आहे.
च्आशियाई बाजारातून विदेशी गुंतवणूकदारांनी पैसे काढून घेण्याचा सपाटा लावल्यामुळे बाजारांवर परिणाम झाला. आशियाई बाजारांत संमिश्र कल दिसून आला. चीन, हाँगकाँग आणि जपान येथील बाजार 0.0९ टक्के ते २.५६ टक्के घटले.
च्या उलट तैवान, दक्षिण कोरिया आणि सिंगापूर येथील बाजार 0.१८ टक्के ते 0.९५ टक्के वाढले.
च्युरोपीय शेअर बाजारात सकाळच्या सत्रात तेजीचे वातावरण दिसून आले. जर्मनी, फ्रान्स आणि ब्रिटन येथील बाजार 0.३७ टक्के ते 0.६४ टक्के तेजीत असल्याचे दिसून आले.
सेन्सेक्स आठवड्याच्या नीचांकावर
मंगळवारी रिझर्व्ह बँकेचा पतधोरण आढावा जाहीर होणार असल्यामुळे सोमवारी शेअर बाजारांत सावध वातावरण दिसून आले.
By admin | Updated: February 3, 2015 01:24 IST2015-02-03T01:24:05+5:302015-02-03T01:24:05+5:30
मंगळवारी रिझर्व्ह बँकेचा पतधोरण आढावा जाहीर होणार असल्यामुळे सोमवारी शेअर बाजारांत सावध वातावरण दिसून आले.
