मुंबई : अत्यंत अस्थिर वातावरणात बुधवारी शेअर बाजारांनी अल्प डुबकी मारली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २५ अंकांनी कोसळून २६,२४६.७९ अंकांवर बंद झाला. हा सेन्सेक्सचा दोन महिन्यांचा नीचांक ठरला आहे. आयटी क्षेत्राला आजच्या पडझडीचा मोठा फटका बसला.
सकाळी बाजाराची सुरुवातच पडझडीने झाली. सेन्सेक्स खालच्या पातळीवर २६,२२९.६७ अंकांवर उघडला. त्यानंतर तो आणखी घसरून २६,१५0.0९ अंकांपर्यंत खाली गेला.
ब्ल्यूचिप कंपन्यांमधील खरेदीने सेन्सेक्समधील घसरणीला चाप लावला. खाली गेलेली पातळीही सावरली. याचा परिणाम होऊन बाजार २६,३३८.३१ अशा वरच्या पातळीवर गेला. नंतर तो पुन्हा थोडा खाली आला. दिवस अखेरीस २६,२४६.७९ अंकांवर बंद झाला. आदल्या दिवशीच्या तुलनेत २५.१८ अंक सेन्सेक्सला गमवावे लागले. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा सीएनक्स निफ्टी ९.७0 अंकांनी म्हणजेच 0.१२ टक्क्यांनी कोसळून ७,८४२.७0 अंकांवर बंद झाला. जुलै-सप्टेंबर या तिमाहीचे निकाल जाहीर होण्याआधी इन्फोसिसच्या शेअर्सने ४.७0 टक्क्यांची मोठी डुबकी घेतली. अमेरिकेतील सिटी ग्रुपने इन्फोसिसच्या दर्जात घट केल्याने हा फटका कंपनीला बसला. आधी कंपनीचा दर्जा गुंतवणूकदारांसाठी ‘खरेदी’ असा होता. तो आता सिटी ग्रुपने ‘तटस्थ’ असा केला आहे. इन्फोसिसमधील घसरणीचा फटका बीएसई आयटी इन्डेक्सला बसला. हा इंडेक्स ३.४४ टक्क्यांनी खाली आला. आजच्या पडझडीमुळे इन्फोसिसची बाजारातील किंमत १0,३४१.३१ कोटींनी कमी होऊन २,0९,६0७.६९ कोटी झाली. विप्रो आणि टीसीएस या अन्य आयटी कंपन्यांचे शेअर्स अनुक्रमे ४.0३ टक्क्यांनी आणि १.९0 टक्क्यांनी कोसळले. (प्रतिनिधी)
सेन्सेक्स दोन महिन्यांच्या नीचांकावर
अत्यंत अस्थिर वातावरणात बुधवारी शेअर बाजारांनी अल्प डुबकी मारली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २५ अंकांनी कोसळून २६,२४६.७९ अंकांवर बंद झाला
By admin | Updated: October 9, 2014 03:33 IST2014-10-09T03:33:15+5:302014-10-09T03:33:15+5:30
अत्यंत अस्थिर वातावरणात बुधवारी शेअर बाजारांनी अल्प डुबकी मारली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २५ अंकांनी कोसळून २६,२४६.७९ अंकांवर बंद झाला
